गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांनी केला ठाकरे गट सेनेत प्रवेश

 ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर पडते अनेकांची भुरळ,

     गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांनी केला ठाकरे गट सेनेत प्रवेश


पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १९ जुलै,

             कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेनेचा गड मजबूत ठेवण्यासाठी अनेक निष्ठावंत शिवसैनिक कोणत्याही आमिषाला बळी न पडता पक्ष संघटना मजबूत करण्यात भर देत असताना उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वाच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत अती दुर्गम भागातील गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांनी ठाकरे गट शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.
              तर गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांचा जाहीर पक्षप्रवेश शिवसेनेच्या मध्यवर्ती कर्जत मधील शिवालय कार्यालयात पार पडला असून याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत पंचायत समितीचे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत, युवासेनेचे विधानसभा अधिकारी ॲड.संपत हडप, शिवसेना खालापुर संपर्कप्रमुख उमेश गावंड, उपतालुकाप्रमुख दिनेश घाडगे, विभागप्रमुख कल्पेश पाटील, युवासेना उपतालुका अधिकारी अंकुर बामणे, रोहित बामणे आदी प्रमुखासह शिवसैनिक - युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत पक्ष संघटना वाढीवर भर दिला असता त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊ लागल्याने खालापूर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गारमाळ येथील आदिवासी समाज बांधवांनी नितीन सावंत यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत ठाकरे गट शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेत शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर