आत्करगाव येथे माझी लाडकी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्सपूर्त प्रतिसाद.

 आत्करगाव येथे माझी लाडकी लाडकी बहीण योजनेला महिलांचा उत्सपूर्त प्रतिसाद.




पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खालापूर : १० जुलै,

               मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबीर नुकताच आत्करगाव  ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय होनाड यांच्या संयुक्त विद्यमानातून आयोजित करण्यात आले होते.सदर शिबिरात आत्करगाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले.ग्रामपंचायत हद्दीतील महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आत्करगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश पाटील यांनी पुढाकार घेत रायगड जिल्ह्याधिकारी किसन जावळे यांच्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी अजित नैराले,तहसीलदार आयुब तांबोळी आणि मंडळ अधिकारी भरत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली होनाड सजेचे तलाठी आर बी कवडे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांचे अर्ज भरून घेतले.
             या योजनेमुळे गरीब कष्टकरी महिलांना राज्य सरकार तर्फे दरमहा प्रत्येकी १५००  रुपये देण्यात येणार आहेत.या शिबिराची सुरुवात उपसरपंच गणेश पाटील आणि तलाठी आर बी कवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.सदर शिबिराला असंख्य महिलांनी उदंड प्रतिसाद देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला.
              शिबिरादरम्यान महिलांच्या शंकेचे निरसन करन्यात आले.तसेच अर्ज प्रक्रियातील विविध बाबींची माहितीही देण्यात आळी.गणेश पाटील यांनी आपल्या भाषणात या योजनेच्या महत्वावर प्रकाश टाकला तर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याचे ध्येय व्यक्त केले.त्यांनी महिलांना सरकारच्या विविध योजणांचा लाभ घेण्यासाठी प्रेरित केल.कार्यक्रमानंतर सर्व महिलांनी उपसरपंच गणेश पाटील आणि तलाठी आर बी कवडे यांचे आभार मानले आणि या योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीबाबत समाधानही व्यक्त केले.शिबिराच्या यशस्वी आयोजणामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.भविष्यकाळातही अशाच उपक्रमाला उदंड प्रतिसाद देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण