ब्रेक फेल झाल्यांने ट्रक पलटी,सुदैवांने जिवित हानी नाही

 ब्रेक फेल झाल्यांने ट्रक पलटी,सुदैवांने जिवित हानी नाही,





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खोपोली : ९ जुलै,
                       कर्नाटक वरून निघालेला ट्रक हा मुंबई - पुणे या मार्गावरील 43.800 या लेन वर येताच ट्रक चा,एअर पाईप मध्ये बिगाडझाल्यामुळे ब्रेक फेल झाले.यामुळे हे वहान रिव्हर्स येऊन सिमेंट डिव्हायडरला ठोकर लागून पहिल्या व दुसऱ्या लेनवर पलटी झाला.या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून वाहनांचे नुकसान झाले. 
               मिळालेल्या सूत्राच्या माहिती नुसार मुबई - पुणे या मार्गावरील वाहन चालक नयास पशा वय 26 वर्षे रा.कर्नाटक हा आपल्या जवळ असलेल्या ट्रक घेऊन मुंबईच्या दिशने जात असतांना 43.800 या ठिकाणी येताच एअर पाईप बिगाड झाल्यामुळे  ब्रेक फेल झाले.सदर हे वाहन रिव्हर्स मध्ये सिमेंटच्या डिव्हायडरला ठोकल्यामुळे वाहन पलटी झाले या मध्ये ३५ टन माल असल्यामुळे तो खाली केल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे त्यांस हेड्राच्या च्या साह्याने बाजूला करण्यांत आले. 
                       सदर अपघाताची माहिती मिळताच,आय आर बी पेट्रोलिंग,देवदूत यंत्रणा,डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल महामार्गावरील वाहतूक पोलीस यंत्रणा, बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनच्या यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण