खोपोली सोमजायवाडील मटण विक्री व्यवसाय सूरु करण्यासाठी आमदार थोरवे यांना साकडे,
आमदार काय प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लागले लक्ष
पाताळगंगा न्यूज : किशोर साळुंखे
खोपोली : १३ जुलै,
खोपोली शहरातील सोमजाय वाडी येथील पारंपारिक व्यवसायीक मटण विक्रि करणारे व्यवसाय स्थानिक तक्रारी नंतर बंद करण्यात आल्याने उपासमारीची वेळ आलेल्या मटण विक्रि व्यवसायीकांनी सदर व्यवसाय पुन्हा सूरू करण्यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून आमदार महेंद्र थोरवे यांना साकडे घातले असून ह्यांच्याकडे अर्ज विनंती केली आहे.
खोपोली नगरपरिषद हद्दितील सोमजायवाडी येथे अनेक वर्षांपासून मटण विक्रि व्यवसाय आहेत. परंतू काही महिन्यांपूर्वी स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्थेच्या वतीने सदर व्यवसाय बंद करण्याची मागणी शासन स्तरावर करण्यात आल्यानंतर शासनाने खोनपा प्रशासनाने त्वरीत सदर व्यावसाय बंद केले.या व्यवसायावरच संबंधितांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालत असताना शासनाच्या अधिकार्यांनी त्यांच्या रोजीरोटीचा विचार न करताच सदर व्यावसाय बंद केल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सदर व्यवसायीकांनी खोपोली नगरपरिषदेचे उंबरठे वारंवार झिजवले , परंतू सदर व्यावसाय सूरु करण्यात न आल्यानंतर या व्यवसायीकांनी ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदना मोरे यांच्याकडे कैफीयत मांडली.या नंंतर ताराराणी ब्रिगेडच्या वतीने खोपोली नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत चर्चा झाल्यानंतर सदर व्यवसाय सूरु करण्याची मागणी करण्यात आली.परंतू अद्याप खोनपाकडून व्यवसाय सूरु करण्याबाबत हिरवा कंदिल मिळत नसल्याने या व्यवसायीकांनी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनाच हे व्यावसाय सूरु करण्याबाबत साकडे घातले.
ताराराणी ब्रिगेडच्या अध्यक्षा वंदना मोरे यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले कि, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली आहे. परंतू खोपोलीत याच लाडक्या बहिणींच्या व्यावसायावर गदा आल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हा अन्याय असून सदर व्यावसायी सर्व नियम पाळून सदर व्यावसाय सूरु करण्यास तयार असून आमदार थोरवे यांनी स्वता लक्ष देवून या लाडक्या बहिणींचे व्यावसाय सूरु करुन द्यावेत . अशी मागणी केली आहे.
खोपोली नगर परिषदेत या विषयावर उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्या दालनात वरिल विषयावर वादळी चर्चा करण्यात आल्यानंतर सर्व व्यावसायीकांनी आमदार महेंद्र थोरवे यांनाच साकडे घातल्याने आता हे व्यावसाय सुरु करण्यासाठी आमदार काय प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments