अनार्डे फाउंडेशनच्या गलथान कारभार
पुराच्या पाण्याने केलवलीकरांचे केले मोठे नुकसान,अनार्डे फाउंडेशनच्या गलथान बांधकामामुळे पुराचे पाणी घुसले गावात
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १४ जुलै,
खालापुर तालुक्यात १३ जुलै दुपारपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असता या पुरामुळे अनेकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असता खालापूर तालुक्यातील ग्रामीण केलवली गावातही पुराचे पाणी गावात आल्याने काहींचे नुकसान झाले असून या पुराच्या पावसाने अनेकांच्या शेतीचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले असता अनार्डे फाउंडेशन नी गावाशेजारी बांधलेल्या बंधारामुळेच ही पूरस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त करत अनारडे फाउंडेशनच्या या मनमानी कारभारीबाबत नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी होत आहे.
केळवली गावात पाण्याची पातळी वाढावी या उद्दिष्टाने अनार्डे फाउंडेशनने केळवली गावात अनेक ठिकाणी बंधारे बांधले, परंतु हे बंधारे बांधताना ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याने या बंधारामुळे पूरस्थितीत गावकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. तर याबाबत त्यांच्या अधिकाऱ्यांना याची कल्पना गावकऱ्यांनी दिली असतानाही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने गावात पूरस्थिती निर्माण झाली.
गेल्या अनेक दिवसांपासून संत असलेल्या पावसाने रौद्ररूप धारण करत खालापुर तालुक्याला झोडपून काढले तर या पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण केली असता कधी न होणाऱ्या केलवली गावातही पूरस्थिती निर्माण झाल्याने गावात पुराचे पाणी घुसले होते तर या पुराच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचेही नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. पूरस्थिती निर्माण होतात गावकऱ्यांनी गावाशेजारी अनार्डे फाउंडेशनच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळेच गावात पूरस्थिती निर्माण होत नुकसान झाल्याने त्यांच्या या मनमानी कारभार बाबत गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कारवाईची मागणी करत आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
चौकट -
यावर्षी प्रथमच आमच्या गावात पुराचे पाणी घुसले त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर अनार्डे फाउंडेशन नी ग्रामस्थांना विश्वासात न घेता बाधलेल्या बंधार्या मुले व नवीन रस्ता बनवताना ठेकेदारांनी मोरींचे काम चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे गावाला पुराच्या पाण्याचा फटका बसून अनेकांच्या शेतीचे नुकसान झाले आहे.
ग्रामस्थ केलवली - दिनेश पुंडलिक दिसले
0 Comments