कुंभिवली उप सरपंच तुषार गायकवाड यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त,रजिप शाळेत शालेय साहित्य वाटप

 कुंभिवली उप सरपंच तुषार गायकवाड यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त,रजिप शाळेत शालेय साहित्य वाटप 


धामणी आदिवासी वाडी व कुंभिवली ठाकूरवाडी मधील रजिप शाळेत शालेय साहित्य वाटप 
कुंभिवलीचे उपसरपंच तुषार गायकवाड यांचा पुढाकार 



 पाताळगंगा न्यूज :  समाधान दिसले
खालापूर : १३ जुलै,

      खालापुर तालुक्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुंभिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तुषार गायकवाड यांच्या कन्येच्या वाढदिवसानिमित्त कुंभिवली ग्रामपंचायत हद्दीतील धामणी आदिवासी व कुंभिवली ठाकूरवाडीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.                  यावेळी सरपंच रेखा वीर, उपसरपंच तुषार गायकवाड, सदस्य परेश गायकवाड, सागर बारस्कर, नीलम लोते, आशा वाघमारे आदिसह प्रतीक्षा गायकवाड, भूमिका गायकवाड, विशाल गायकवाड, विशाल म्हामुनकर, घनश्याम वीर,हरिश्चन्द्र वाघमारे, पांडुरंग वाघमारे, जनार्दन वाघमारे, सुरेश पवार, किशोर हिलम, गीता हिलम व मोठ्या संख्येने ग्रामस्थ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

            आपला व आपल्या कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस म्हटला की, मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संस्कृती पुढे आहे. मात्र कुंभिवली ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तुषार गायकवाड यांनी आपल्या कन्येचा वाढदिवस कोणताही गाजावाजा व अवाढव्य वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने वाढदिवस साजरा करत ग्रामपंचायतीतील आदिवासी व ठाकूरवाडीतील शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत हा वाढदिवस साजरा केल्याने तुषार गायकवाड यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे. यामध्ये धामणी आदिवासी व कुंभिवली ठाकूरवाडीमधील रा.जि. शाळेतील विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स, स्टेशनरी, खाऊ असे शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन