माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यास वीज मंडळाची टाळाटाळ ,(खोपोली, पनवेल वीज मंडळाच्या हलगर्जीपणा समोर)
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : १५ जुलै,
खोपोली येथील मराविविकं मर्या. उपकार्यकारी अभियंता व पनवेल येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे माहितीच्या अधिकारात मागितलेली माहिती देण्यासाठी टाळाटाळ होत असून माहिती दिल्यास आपल्याच कार्यालयातील चुकीच्या कामकाजाचे वाभाडे निघण्याची भिती वाटत असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अपिल करणार असल्यांची माहिती पत्रकार हनुमंत मोरे यांनी दिली आहे.
आपण दिनांक ११ मार्च २०२४ रोजी खोपोली येथील मराविविकं मर्या.उपकार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि.२९/०८/२०२३ रोजी पाली फाटा येथे नामदेव हनुमंत वाघमारे यांचा काम करतांना मानवी प्राणांकित अपघाताबद्दल खुलासा मागितला होता.हा अपघात होण्यामागील कारणांचा खुलासा करण्याबाबत माहिती मागविण्यात आली होती.एका व्यक्तीचा प्राणांकित अपघात घडतो आणि या अपघाताची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असलेला सहायक कार्यकारी अधिकारी फक्त समज देऊन मुक्त करीत असेल तर मराविविकं मर्या.कंपनीला कामगारांच्या जीवाशी कसलाच संबंध नसल्याचे दिसून येते.
खोपोली मराविविकं मर्या.मध्ये वरिष्ठ तंत्रज्ञ असलेल्या सुहास वसंत कुंभार यांनी त्या दिवशी २२ kv फिडरची दुरूस्तीचे काम चालू होते.यासाठी सुहास कुंभार यांनी रितसर परवानगी घेऊन त्यांच्या देखरेखीखाली काम करण्यासाठी नामदेव हनुमंत वाघमारे याला पोलवर चढविले होते आणि त्यांनी चढविलेल्या पोलवरील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला नव्हता त्यामुळे नामदेव वाघमारे यांचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता.या अपघाताला सुहास कुंभार हेच कारणीभूत असल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले असतांनाही फक्त समज देत त्याची सुटका करण्यात येत असल्याने शंकेची पाल चुकचुकली आहे.
याबाबत मागितलेली माहिती अर्धवट स्वरूपात देत उपकार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता पनवेल हे माहिती देण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचा आरोप पत्रकार हनुमंत मोरे यांनी केला असून आपण लवकरच याबाबत वरिष्ठ कार्यालयात या बाबत अपिल करणार असून मंत्रालयात देखील या दोन्ही अधिकाऱ्यांची तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0 Comments