समाजसेवक आनंदराव कचरे यांचा वाढदिवस साजरा...
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १५ जुलै,
रायगड जिल्यातील जेष्ठ समाजसेक तथा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे रायगड जिल्हा प्रभारी आनंदराव कचरे यांचा नुकताच वाढदिवसाच्या साजरा करण्यात आला असून सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे,
आनंदराव कचरे हे रायगड जिल्हात गेल्या अनेक वर्षांपासून ऑल इंडिया धनगर महासंघाचे काम करत असून त्यांनी या संघटनेचे काम दऱ्या खोऱ्यातील गोर गरीब धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर पोचवून त्यांना न्याय देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत,
ऑल इंडिया धनगर समाज महासंघांचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात काम करत असून दऱ्या खोऱ्यातील गोर गरीब उपेक्षितांची मुले शिकली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून काम करत आहेत, त्यासाठी त्यांनी बहुजन समाजातील अनेक गोर गरीब वंचित मुलांना दत्तक घेतले आहेत तर काहीना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत,
त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आनंदराव कचरे यांनी रायगड जिल्हात समाजासाठी मोठे काम केले असून गोर गरिबावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार यावर आवाज उठवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर अनेक ठिकाणी त्यांनी रायगड जिल्हातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे जेणेकरून समाजातील तरुण पिढी शिकून समाजात शिक्षणाची क्रांती घडेल यासाठी ते आजही मेहनत घेत आहेत,
त्यांचा नुकताच वाढदिवस साजरा झाला असून त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरानी भेटून व फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत,
0 Comments