माध्यमिक शाळा वडवळ येथे ८ ते १०वीच्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन व छत्री ,खाऊ,प्राथमिक उपचार किट वाटप लायन्स क्लब चा पुढाकार
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खालापूर : १६ जुलै,
लायन्स क्लब खालापूर च्या माध्यमातून अनेक उपपक्रम राबवित असताना, जागतिक युवा कौशल्य दिनाच औचित्य साधून माध्यमिक शाळा वडवळ येथे आठवी ते दहावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वह्या,पेन व छत्री ,खाऊ,प्राथमिक उपचार किट वाटप करण्यांत आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या चेह-यावर स्मित हास्य झळकत असल्यांचे पहावयांस मिळाले.या प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यांत आला.
लायन्स क्लब सातत्याने विविध उपक्रम हाती घेत असल्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात या क्लब चे नाव नावलौकिक झाले आहे.सध्या पावसाळ्यांचे दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना येत असलेल्या समस्या विचारांत घेवून हा उपक्रम हाती घेण्यांत आला होता.पाउस पडत असल्यामुळे कोणताही विद्यार्थी भिजू नये तसेच शिक्षण घेत असतांना त्यांस शैक्षणिक साहित्यांची कमतरता भासू नये,त्याच बरोबर या ठिकाणी विद्यार्थी खेळत असतांना दुखापत झाल्यांस प्राथमिक उपचार किट देण्यांत आली.त्याच बरोबर विद्यार्थ्यांना खावू वाटप करण्यांत आले.
यावेळी लायन्स कल्ब प्रोजेक्ट चेअरमन जितेंद्र सकपाळ,अध्यक्ष - शिवानी ताई जंगम,उपाध्यक्ष - लहू भोईर,भरत पाटील,खजिनदार - किशोर पाटील,अशोक पाटील मा हरिभाऊ जाधव,कांचन ताई जाधव,महेंद्र सावंत,सी.एस.आर, फंड - तानाजी चव्हाण,बँकेबेस्ट कंपनीतील अधिकारी- रणजित ग्रोव्हर,ग्रामपंचायत सरपंच,उप सरपंच,सदस्य,ग्रामस्थ,सामाजिक कार्यकर्ते अदि उपस्थित होते.
0 Comments