१०२ विद्यार्थ्यांना केले साहित्य वाटप....

 अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप 

  १०२ विद्यार्थ्यांना केले साहित्य वाटप....


पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : १५ जुलै,


              अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टच्या वतीने आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या कराड तालुक्यातील प्राथमिक शाळा धोंडेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
         अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या वतीने दरवर्षी वर्षी गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. 
             त्याचप्रमाणे  बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अंधारातुन प्रकाशाकडे नेण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आणि शिक्षणाशिवाय आपली परिस्थिती सुधारली पाहिजे यासाठी जनजागृती अभियान राबवून समाज जागृत करण्याचे काम सुरू आहे म्हणून  डोंगर दर्या खोऱ्यातील जंगलातील गोरगरीब वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. 
           या वर्षी ३१ मे २०२४रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप करणेचा उपक्रम कराड तालुक्यातील भोसलेवाडी  ओडोशी येथे. व माण तालुक्यातील पिंगळी दडसवाडा शेवरी. या गावातील. २२४ विद्यार्थ्यांना मदत केली आहे.  तर १३ जुलै रोजी धोडेवाडी जि परिषद शाळा मधील इयत्ता १  ते ४ मधील १०२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे  

             डिचोली कोयनानगर पुनर्वसन येथील प्राथमिक शाळा मधील १७   विद्यार्थ्यांना मदत केली आहे अश्या एकूण 343 मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं आहे या प्रसंगी प्रवीण  काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ प्रकाश काकडे चेअरमन धोडेवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी रघुनाथ काकडे माजी सरपंच माणिकराव गंगावणे पोलिस पाटील प्रताप मोरे ग्राम पंचायत सदस्य संदीप काकडे ग्राम पंचायत सदस्य  रुपाली काकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती रवि काकडे अमोल काकडे दिनकर कदम तानाजी काकडे आप्पा राव काकडे जनार्दन शेरेकर माणिकराव भोसले कुबीर भोसले जयदीप गडाळे हर्षवर्धन काकडे सौ रुपाली ग काकडे मनिषा पाटील राणी पाटील दिपाली पवार रंजना सरगर मनिषा काकडे उज्वला गडाळे रेणुका शेडगे अर्चना गलांडे विजया काकडे प्राजक्ता पाटील इत्यादी उपस्थित होते याप्रसंगी मा तुकाराम काकडे संचालक रयत सहकारी साखर कारखाना व हाँटेल धनगर वाडा चे मालक रवी काकडे यांची भाषणे झाली.प्रासताविक मुख्याध्यापिका शोभा गरुड यांनी केले आभार भालचन्द्र थोरात यांनी केले,.                
                 तर डिचोली  कोयनानगर धोडेवाडी पुनर्वसन येथील   गावातील १७ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले होते त्यावेळी मा प्रवीण काकडे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज शाळेच्या मुख्याध्यापिका  शालिनी पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबुराव बावधाने  जयराम कोळेकर जगन्नाथ कोळेकर धाकलु कोळेकर बाळु कोळेकर रेश्मा बावधाने जयवती बावधाने ओंकार कोळेकर भागोजी कोळेकर रुपाली काकडे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती तुकाराम काकडे संचालक रयत सहकारी साखर कारखाना प्रकाश काकडे चेअरमन धोडेवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटी मनोज काकडे जयदीप गडाळे हर्षवर्धन काकडे माणिकराव गंगावणे आप्पासाहेब काकडे इत्यादी उपस्थित होते व विद्यार्थी प्रताप मोरे ग्राम पंचायत सदस्य संदीप काकडे ग्राम पंचायत सदस्य अशोक काकडे चेअरमन धोंडे वाडी गणेश पतसंस्था व विद्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन