डोक्यावर तुळस, मुखात विठ्ठल विठ्ठल',नाम 'मस्तकी पांडुरंगाचा बुका, विद्यार्थी झाले वारकरी

 डोक्यावर तुळस, मुखात विठ्ठल विठ्ठल',नाम 'मस्तकी पांडुरंगाचा बुका, विद्यार्थी  झाले वारकरी





पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वाशिवली  : १५ जुलै,
 
        आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त आणी वारकरी जात असतात. मात्र या विद्यार्थ्यांना या पंढरपूर येथे जाता आले नसले तरी सुद्धा या ठिकाणी वारकरी यांची वेष भुषा करुन आम्ही वारकरी झालो सौ. विमलाताई पारनेरकर प्राथः विद्यामंदिर- वाशिवली च्या विद्यार्थ्यांनी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शिक्षक वर्गांनी मोठ्याप्रमाणावर सहभाग नोंदविला.
                यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेपासून ते वाशिवली येथिल असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिर येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.मुलींने डोक्यावर तुळस नववारी साडी नेसून तर मुलाने मस्तकावर बुक्का,अबीर,धोतर पांढरी टोपी,गळ्यात टाळ मृदंग घालून वारकरी वेष परिधान केल्यांचे पहावयास मिळाले मुखात हरीनाम आणी विठ्ठलाचा गजर करीत ही पायी दिंडी काढण्यात आली यावेळी त्यांच्याकडे पहातांना मुले जणू वारकरी झाली असून ते पंढरपूर ला जात आहे की काय असा भास येथिल ग्रामस्थ आणी प्रवासी वर्गांना भासत होते.यावेळी गावदेवी महिला बचत गट - वाशिवली च्या महिलांनी दिंडीचे स्वागत करून खाऊचे वाटप करण्यांत आले.
           यावेळी संस्थेचे अध्यक्ष- तु. धो. पाटील,मुख्याध्यापिका – मीनाक्षी रणदिवे, सहशिक्षक कल्पना गव्हाणे,लहु वारगुडे सर, संजीवनी म्हात्रे, शिक्षकवृंद, पालकवर्ग यांचे सहकार्य लाभले







Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार