शाळा जांभिवली येथे जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप,दिव्यांग विद्यार्थ्यांस केली २१ हजार रुपयांची मदत
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १७ जुलै,
खालापूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा जांभिवली येथे सालाबाद प्रमाणे जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच वतीने जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मुकेश भंडारी साहेब यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना व वह्या चे वाटप करण्यात आले. तसेच जांभिवली येथील ग्रामस्थ शिक्षण प्रेमी अण्णा गावडे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट् ड्रेस वाटप करण्यात आले.
इयत्ता चौथी मध्ये दिव्यांग असणारा बालक चैतन्य भुरा गावडे या विद्यार्थ्यास जनुबाई चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने २१ हजार रुपयाचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष मुकेश भंडारी साहेब यांच्याकडून देण्यात आला कार्यक्रमासाठी ए वन कॅन्सचे मॅनेजर मनोहर खरीवले साहेब तसेच फोर्टी प्लस रसायनीचे अध्यक्ष अनंता गाताडे साहेब तसेच उपाध्यक्ष दिलीप तांबोळी साहेब तसेच जांभिवली गावातील उद्योजक काशिनाथ गावडे तसेच जांभिवली गावचे शिक्षणप्रेमी आदरणीय अण्णा गावडे उपस्थित होते.सदर शैक्षणिक साहित्य वाटप केल्या नंतर जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी,फोर्टी प्लसचे पदाधिकारी, अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन समिती जांभिवली, ग्रामस्थ मंडळ शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप, उपशिक्षिका संध्या लोणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा सानप यांनी केले व आभार उपशिक्षिका संध्या लोणकर यांनी मानले.
0 Comments