आगामी विधानसभा निवडणूकित गद्दारांना धडा शिकवा....

 आगामी विधानसभा निवडणूकित गद्दारांना धडा शिकवा....

           कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकवा - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 
   शिवसेना ठाकरे गटाच्या संवाद दौऱ्याची कर्जत  मधून सुरुवात 


पाताळगंगा न्यूज : शिवाजी जाधव 
खोपोली : १७ जुलै,

              कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील गद्दारांना गाडून पुन्हा या मतदार संघावर( उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा) शिवसेनेचा  आमदार निवडून आणून भगवा फडकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसंवाद दौऱ्याची सुरुवात आज कर्जत येथून करण्यात आली यावेळी ते बोलत होते.
         गेल्या अडीच वर्षापूर्वी ज्या चाळीस आमदारांनी शिवसेनेशी जी गद्दारी करून शिंदे सोबत गेलेत त्यात तुमचाही आमदार आहे,  मात्र आमदार गेला असल्याने काही फरक पडत नसून शिवसैनिक शिवसेने सोबत आहे, त्यामुळे गेल्या लोकसभेला या मतदार संघात लीड दिल्याने आपले आभार मानतो मात्र येत्या विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त लीड देऊन  कर्जत खालापूर मतदार संघात शिवसेनेचा आमदार निवडून आणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आणून हे घटनाबाह्य सरकार घालवून गद्दारांना धडा शिकवा असे आवाहन युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे.  
          यावेळी युवासेना प्रमुख आमदार ,आदित्य ठाकरे, शिवसेना नेते आमदार सचिन अहिर, मावळ लोकसभा मतदार संघ संघटक संजोग वाघेरे पाटील,  माजी महापौर तथा  महिला संघटिका किशोरी पेडणेकर, उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत रायगड जिल्हा सल्लागार प्रमुख बबन पाटील,माजी पक्ष प्रतोद भाई शिंदे जेष्ठ नेते रियाज बुबेरे, महिला आघाडी जिल्हा संघटिका सुवर्णा जोशी, रेखा ठाकरे, अनिता पाटील, , खालापूर तालूका प्रमुख एकनाथ पिंगळे, कर्जत तालूका प्रमुख बाबू घारे, शिवसैनिक उमेश गावंड युवासेना प्रमुख खालापूर तालूका अधिकारी महेश पाटील,कर्जत विधानसभा अधिकारी ऍड संपत हाडप,  निखिल पाटील, प्रशांत खांडेकर, आदिसह अनेक शिवसैनिक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात