रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी यशवंत साबळे

 रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्षपदी यशवंत साबळे



पाताळगंगा न्युज : जयवंत माडपे 
खोपोली : २९ जुलै, 
 

               खोपोली शहरातील दानशूर व्यक्तिमत्व व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे यांची रायगड जिल्हा क्रिकेट असोशियनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.खोपोली येथे महाराजा मंगल कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत साबळे यांची ही निवड होतास त्यांच्यावर अभिनंदन वर्षाव झाला. खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पद भूषवत असताना त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्ष पदाची दुहेरी जबाबदारी आल्याने या पदाला निश्चित न्याय देणारच अशी प्रतिक्रिया त्यांच्या निकटवर्तीयांकडून करण्यात येत आहे. 
                खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदी असतानाच त्यांनी नामवंत क्रिकेटपटूंना खोपोलीत आमंत्रित करून दर्जेदार खेळाचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळाले. जिल्हा क्रिकेट असोसिएशन पदी निवड झाल्याने नवोदित खेळाडूंना निश्चितच योग्य तो न्याय मिळणारच अशा अनेक प्रतिक्रिया क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी बोलताना दिल्या.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर