शिक्षण सप्ताह निमित्ताने उपशिक्षणाधिकारी सुनील भोपळे यांची राजिप शाळा वडगाव येथे सदिच्छा भेट
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगाव : ३० जुलै,
नवीन शैक्षणिक धोरण व निपुण भारत च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाने सुरू केलेला शिक्षण सप्ताह उपक्रम शैक्षणिक साहित्य निर्मिती व अध्ययन,गणित,क्रीडा,कौशल्य व डिजिटल,सांस्कृतिक,मिशन मेरी लाईफ इको क्लब,विद्यांजली पोर्टल उपक्रम हे अत्यंत यशस्वी व चांगल्या पद्धतीने सर्व शाळांमध्ये राबविण्यात येत असल्यामुळे मात्र राजिप शाळा वडगाव पाहण्यांसाठी उपशिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग सुनील भोपळे,शिक्षण जिल्हा समन्वयक विशे समावेशीत यांनी शाळेला भेट देवून शाळेची भव्यता पाहून भारावून गेले व कौतुक केले.
रायगड जिल्हा परिषद शाळा ही अल्प महिन्यात नावारुपाला आली असून यांचा एक मेव कारण म्हणजे या शाळेत होत असलेली दिवसेंदिवस प्रगती,ही शाळा पुर्णपणे डिजिटल झाली असून दिवसेंदिवस अमुलाग्र बदल होत चालले आहे.यांचे एक मेव कारण म्हणजे येथिल मुख्याध्यापक सुभाष राठोड,शाळेचा परिसर मनमोहक करुन मुलांच्या मध्ये या शाळेची आवड निर्माण करुन इंग्लीश मेडीयम या शाळेत दाखल असलेली मुळे या शाळेत दाखल झाली आहे. यामुळे विविध अधिकारी या ठिकाणी येवून या शाळेची पाहणी करुन येथिल शिक्षक आणी शाळेचे कौतुक करीत आहे.
यावेळी मा. सरपंच गोरी गडगे व महादेव गडगे यांची विद्यार्थ्यांना सुंदर असे भोजनांची व्यवस्था करुन दिली.यावेळी शिक्षक वैजनाथ जाधव सर,विद्यार्थी,पालक,ज्योती ठोंबरे,स्वयं सेविका निकिता,साक्षी,भाग्यश्री व श्रुतिका शाळा व्यवस्थापन समिती अदि उपस्थित होते.
चौकट
जिल्ह्यात अशी सुंदर व सुसज्ज शाळा पहिल्यांदाच पाहिली, मुख्याध्यापक श्री.सुभाष राठोड कल्पक व उपक्रमशील असून लोकसहभाग उत्तम आहे,सर्व सहकारी शिक्षक व शा.व्य.स.चे सहकार्य चांगले दिसून आले.
उपशिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद, अलिबाग - सुनील भोपळे
चौकट
विद्यार्थ्यांना उत्तमातले उत्तम देण्याचा माझा प्रयत्न आहे,लोकप्रतिनिधी व पालक यांचे सहकार्य खूप चांगले आहे.शाळा सर्व उपक्रमात सहभागी होत असते.त्यामुळे मुलांना शाळेची गोडी लागली आहे.
मुख्याध्यापक, राजिप शाळा वडगाव - सुभाष राठोड
चौकट
सुभाष राठोड सर व सर्व शिक्षक आल्यापासून शाळेत विविध उपक्रमांचे चांगल्या पद्धतीने आयोजन होत असून,मुले सतत अध्ययनात व्यस्त असतात.त्यांचे सर्वांशी संबंध सलोख्याचे असून सर्व घटकांना शालेय उपक्रमात सहभागी करून घेत असतात.
मा.उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत,वडगाव - महादेव गडगे,
0 Comments