भारत सरकारच्या आदिवासी मुळनिवासी विभागाच्या महाराष्ट्र विभागिय अधिकारी पदी लक्ष्मण गायकवाड यांची नियुक्ती

 भारत सरकारच्या आदिवासी मुळनिवासी विभागाच्या महाराष्ट्र विभागिय  अधिकारी पदी लक्ष्मण गायकवाड यांची नियुक्ती  

 

पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे 
खोपोली : २० जुलै,
 
            भारत सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणार्या आदिवासी मुलनिवासी यांचे समाजकार्य करण्या करिता असणार्या राष्ट्रीय स्थरातील विभागाच्या महाराष्ट्र विभागिय अधिकारी पदी लक्ष्मण गायकवाड यांची नूकतीच ऐ.सी . अशोक  रामभाऊ येडेकर  ( आॕल इंडिया आॕफीसर ) यांनी नियुक्ती पत्र देवून त्यांची नियुक्ती केली. भारत सरकारच्या वतीने आदिवासी बांधव तथा मुलनिवासी असणार्या घटकांसाठी त्यांची उन्नती होण्यासाठी विविध स्तरांवर योजना राबविणे, शासनाच्या सर्व उन्नतीमार्गावरिल नियम व लाभ मुलनिवासी बांधवांपर्यंत पोहचविण्याचे काम इंडियन आॕल नाॕन जुडीसीअल सत्यमेव जयते इनहॕबीटन्स आदिवासी समाज यांच्या माध्यमातून होत असते . 
            भारत सरकारने संपूर्ण देश भरात नॕचरल इंडिया नाॕन जुडीसीअल तथा वरिल कार्यपद्धतीतून आदिवासी समाज व मुलनिवासी समाजाच्या उन्नतीवर भर दिला आहे.याच  अभियानातून भारत सरकारच्या वतीने समाजात वावरणारे व पिडीतांच्या समस्या  जाणून सोडविण्यासाठी झटणार्या व्यक्तिंना या अभियानात जोडले जाते. कर्जत खालापूर तालुक्यात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे व मुळनिवासींसाठी झटणारे लक्ष्मण गायकवाड यांना या अभियानातील महाराष्ट्र विभागिय अधिकारी पदी  नियुक्ती केली असून संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर