खालापूरातील नागरिक विविध समस्याने त्रस्त, समस्याचा जाब विचारण्यांसाठी नगरपंचायतीवर धडकले

 खालापूरातील नागरिक विविध समस्याने त्रस्त, समस्याचा जाब विचारण्यांसाठी नगरपंचायतीवर धडकले 

  


पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : २२ जुलै,

              नगरपंचायत खालापूर हद्दीत वाढत्या नागरी समस्यांमुळे त्रस्त झालेले जागृत नागरिकांनी खालापूर नगरपंचायत कार्यालय गाठत समस्यांचा पाढा वाचला  कारभारात सुधारणा करा अन्यथा उग्र आंदोलन करु असा इशारा देण्यांत आला.नगरपंचायत खालापूर हद्दीत कचरा संकलन, पाणी, वाहनतळ समस्यासह विविध समस्या निर्माण असून या मध्ये कोणताही मार्ग निघत नसल्याने प्रत्येक प्रभागातील जागरूक नागरिक सोमवारी एकत्र येत जाब  विचारला. 
             खालापूर नगरपंचायती हद्दीत सातत्याने अनियमित पाणीपुरवठा, चार चार दिवस कचरा संकलन ठप्प, शहरातील मुख्य रस्त्यावर कायम वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी, महड तीर्थक्षेत्री पाणी प्रश्न, यासारख्या एकूण सतरा समस्यांच लेखी पत्र नागरिकांनी नगरपंचायतीला दिले.खालापूर नगरपंचायत मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, नगराध्यक्षा रोशना मोडवे, उपनगराध्यक्ष संतोष जंगम, पाणी पुरवठा सभापती किशोर पवार, नगर अभियंता देवेंद्र मोरखंडीकर यांच्या समोर नागरिकांना समस्या मांडत खुलासा मागितला. यावेळी नागरिकांच्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. 
             सफाई कामगारांच्या सुरू असलेल्या संपाबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन नगरपंचायतीमार्फत देण्यात आले.घनकचऱ्यासाठी शासनाकडून येणारा निधी बंद झाल्याने कचरा संकलन समस्या वारंवार डोकं वर करत असल्याची माहिती यावेळी नगरपंचायतीने दिली. नगरपंचायत हद्दीतील नागरिकांची समिती गठीत  करण्यात यावी जेणेकरून नगरपंचायत आणि नागरिक यांच्यात समन्वय राहील अशी मागणी यावेळी करण्यात आली.
          यावेळी खालापूर मधील जेष्ठ नागरिक दिपक बोंदार्डे , मंदा भोसले,क्षमा आठवले,विद्यमान नगरसेवक राजेश पारठे, नगरसेविका सुप्रिया साळुंखे, नगरपंचायतीचे माजी नगरसेवक अवधूत भुर्के, सामाजिक कार्यकर्ते विजय सावंत,दिपक जगताप,नितीन पाटील, उमेश पडवकर,संभाजी पाटील,सचिन कळमकर,दत्ता चाळके,  प्रतीक लोखंडे,  संजय वाडेकर, अजिंक्य जोशी, बबन चव्हाण, राजेश बोंदार्डे तसेच प्रत्येक प्रभागातील नागरिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments

 वै. ह.भ.प. सुलोचना दत्तात्रेय पाटील ह्यांचे अकस्मात   निधन