खोपोली येथे भव्य जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेचे,श्लोक शरद ढवाळकर प्रथम क्रमाकांचे मानकरी
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
खोपोली : २१ जुलै,
कुस्ती महर्षी स्व.भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मृती दिनानिमित्त जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा चे आयोजन महाराजा मंगल कार्यालय खोपोली येथे गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे अनावरण भारतीय खेल प्राधिकरणाचे वरिष्ठ प्रशिक्षक तथा भारत सरकारचा सर्वोच्च क्रिडा प्रशिक्षकांचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त राजसिंग चिकारा यांच्या हस्ते करण्यांत आले.
या भव्य स्पर्धेत प्रामुख्याने महाड, पनवेल, खोपोली, खालापूर, कर्जत, उरण पनवेल महानगरपालिका क्षेत्र येथील १३० हून अधिक पुरुष व महिला कुस्तीपटूंनी सक्रिय सहभाग नोंदविला आला.यावेळी खालापूर तालुक्यातील माजगांव येथिल असलेले श्लोक शरद ढवाळकर जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेत खोपोली येथे प्रथम क्रमांक पटकविला यामुळे,त्याचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
श्लोक आपल्या घराण्याचा वारसा पुढे घेवून जात असून त्यांचे काका रमेश ढवालकर मा.ग्राम पंचायत सदस्य, यांनी देखील खुस्ती मध्ये गावच नाव राज्यात पुढे नेले.तसेच श्लोक चे वडील शरद ढवालकर यांनी देखील शालेय स्पर्धेत कुस्ती मध्ये नाव लौकिक कमावले होते .असा घराण्यात कुस्तीचा वारसा श्लोक ला लाभला आहे असून आज झालेल्या खुस्ती स्पर्धेत मिळवलेले यश हे त्यांच्या घराण्यांचा वारसा चालवत असल्यांचे बोलले जात आहे.
या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहाय्यक प्रशिक्षक कन्हैयालाल यादव, या समयी केएटीएसपी मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, शिवसेना नेते पंकज पाटील, खोपोलीतील उद्योजक यशवंत साबळे, अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील, युवा उद्योजक विक्रम साबळे, सामजिक कार्यकर्ते विक्रम पाटील, गुरुनाथ साठेलकर, महेश पवार, जितेंद्र सकपाळ, ईश्वर शिंपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments