टोलनाक्याच्या लोखंडी खांबाला एसटीची जोरात धडक

  

महांडळाच्या एसटी बसने दिली वडवळ जवळील टोलनाक्याला धडक,पाच प्रवाशी किरकोळ जखमी 
तर चालकाच्या पायाला गंभीर दुखापत...



पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे  
खोपोली  : ३० जुलै,

         खोपोली पेण रस्त्यावर वडवळ गावाजवळ असलेल्या टोलनाक्याला एसटी महांडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला, या अपघातात बस मधील पाच प्रवाशांना किरकोळ जखमी झाले आहेत.तर  वाहान चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे, 
           एसटी महांडळाची बस पेणहुन खोपोली कडे दुपारी ही बस ही प्रवाशी घेऊन जातं असताना ती वडवल गावाजवळ आली असता चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बसने समोरील टोलनाक्याच्या लोखंडी खांबाला जोरात धडक दिली,
           या अपघातात बस मधील पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला असून चालकाच्या पायाच्या अंगठ्याला जोरदार मार लागला आहे, तर बसचेही दोन्ही टायर निघून मोठे नुकसान झाले आहे. 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर