ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,१६५ विद्यार्थ्यांना केले साहित्य वाटप,आमदार महेश लांडगे आणि प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांची प्रमुख उपस्थिती,पिंपरी चिंचवड शाखेचा स्तुत्य उपक्रम....
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३० जुलै,
ऑल इंडिया धनगर समाज म्हणसंघ पिंपरी चिंचवड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा शैक्षणिक सोहळा नुकताच पिंपरी चिंचवड येथे पार पडला असून या कार्यक्रमाला आमदार महेश लांडगे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, भाजपा नेते शंकर जगताप प्रमुख पाहुणे होते.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे यांचे एकच ध्येय असून समाजात शिक्षणाची क्रांती घडली पाहिजे, समाजतील मुले मुलींनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचा विकास साधावा जेणेकरून समाजातं विकासाची क्रांती घडेल हे उद्धीष्ट ठेवून हा महासंघ काम करत आहेत त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करून १६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून सन्मान पत्र देण्यात आले,
यावेळी आमदार महेश लांडगे ऑल इंडिया महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे भाजपा नेते शंकर जगताप,व्याख्याते शरद करणवर प्रा डॉ.विठोबा तळे सुनील शेंडगे राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व हनुमंतराव दुधाळ राज्य उपाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ मा.नगरसेवक राजू दुर्गे गजानन वाघमोडे, अध्यक्ष अहिल्यादेवी प्रतिष्ठान रुपीनगर अरुण पाडुळे, सुर्यकांत गोफणे, अंकुश भांडं, मुकुंद कुचेकर, व्यंकटराव वाघमोडे, मधुकर लबाते, विना सोलवनकर, संतोष वाघमोडे, महेंद्र दडस, आशा काळे, अजय दुधभाते, नाना शिंदे, उद्योगपती रेखा दुधभाते, काळुराम कवितके, डॉ.सोमनाथ सलगर, डॉ.भानुदास कुलाळ,गोविंद वलेकर, मधुकर लबाते, प्रतिभा काळे, राजु धायगुडे, अजित चौगुले, सदाशिव पडळकर, उपस्थित होते.
प्रास्ताविक महावीर काळे यांनी केले आभार यशोदा नायकवडी अध्यक्षा युवती आघाडी यांनी मानले सोना गडदे अध्ययक्षा महिला आघाडी हिराकात गाडेकर अध्यक्ष युवक आघाडी सुनील बनसोडे अध्यक्ष मराठवाडा विभाग नवनाथ देवकाते संजय नायकवडी जिल्हा अध्यक्ष पुणे जिल्हा बाळासाहेब कारंडे संजय कवितके पल्लवी मारकड संतोष पांढरे अध्यक्ष सचिन शिंदे रोहिदास पोटे दादा दोलताडे बाळासाहेब यमगर रणजित गोरड शिवाजी गलांडे अशोक शेंडगे काका मारकड समाधान सोनवलकर सतिश पाटील सचिन कोपनर सुरेखा जानकर नंदा करे आदिसह अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments