ओम गगनगिरी हॉस्पिटलचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण

 ओम गगनगिरी हॉस्पिटलचे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते अनावरण 


आरोग्य सेवा देण्यासाठी प्राधान्य, ओम गगनगिरी हेल्थ सर्विस तत्पर ..डॉ.प्रकाशराव शेंडगे 


पाताळगंगा न्यूज : शिवाजी जाधव
खोपोली : १७ जुलै,

            उलवे सेक्टर २३ येथील ओम गगनगिरी हेल्थ सर्विस, ओम गगनगिरी हॉस्पिटलचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते १५ जुलै रोजी करण्यात आले. डॉक्टर प्रकाशराव शेंडगे हे या हॉस्पिटलचे डायरेक्टर असून यावेळी अल्प दरामध्ये नागरिकांच्या चाचण्या करण्यात येणार असल्यांचे त्यांनी सांगितले तसेच या हॉस्पिटलला रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या.असून जी मदत लागेल ते पुर्ण करण्याचे आश्वासन देण्यांत आले. 
            हॉस्पिटलतर्फे रुग्णांच्या वैद्यकीय चाचण्या करण्यासाठी फिरती बस ठेवण्यात आली आहे. हेल्थ बसची पाहणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली. यावेळी प्रथितयश डॉक्टरांचा सन्मान मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी आरपीआयचे सुमित मोरे महाराष्ट्र प्रदेश सदस्य,  रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पनवेल महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, सुशांत सपकाळ कोकण प्रदेश युवक अध्यक्ष, माजी महापौर सुधाकर सोनवणे श्रमिक ब्रिगेड प्रदेश सचिव तूषार कांबळे , ओशियन स्टेलर मेरीटाईम प्रायव्हेट लिमिटेड को -फौंडर, मॅनेजिंग डायरेक्टर वसीम अन्वर व यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

खोपोली शहरातील भटक्या श्वानांच्या निर्बिजीकरण उपक्रमाची सुरुवात