निसर्गाच्या सानिध्यात विविध पक्षांची मांदियाली ,राहुल जांभुळकर यांनी आपल्या कॅमे- यात केले विविध पक्षी कैद

 निसर्गाच्या सानिध्यात विविध पक्षांची मांदियाली ,राहुल जांभुळकर यांनी आपल्या कॅमेर-यात केले विविध पक्षी  कैद 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
वडगांव : १७ जुलै,
   
               वडगांच्या काही अंतरावर माणिकगड म्हणून प्रचलित आहे.अश्या या निसर्गरम्य च्या ठिकाणी विविध पक्षी पहावयांस मिळत असतात.मात्र या पक्षांचे फोटो अलगद आपल्या कॅमे-यात टिपणारा व्यक्ती मात्र कुणांच्या परिचयात येतच नाही राहुल जांभुळकर यांनी आपल्या जवळ असलेल्या कॅमे-यातून सुंदर असे पक्षाचे फोटो कैद केल्यामुळे खरोखरच या पक्षांना पाहून मनाला समाधान मिळत आहे.
       



         पावसाळ्यात जणु धरती हिरवी शाल परिधान करीत असते.विविध प्रकारचे झाडे वनस्पती निर्माण होत असतात.अश्या या झाडावर किटक येत असतांना त्यांना आपले भक्ष बनविण्यांसाठी हे पक्षी आपल्याला दिसत असतात.आणी त्याच क्षणांला हे फोटो कैद केले जाते त्याच बरोबर घराच्या समोर अंगणात असे पक्षी येत असतात.पक्षांचे किलबिल मनाला स्पर्श करुन जाते.मात्र त्यांची हालचाली बारकावे सहज आपल्या मोबाईल मध्ये अथवा कॅमे-यात कैद करणारा व्यक्ती आपल्याला परिचित नसतो.



      मात्र पाताळगंगा न्यूज या वेब पोर्टल च्या माध्यमातून संपुर्ण फोटो या मध्ये घेण्यांत आले.ग्रामीण भागातील व्यक्ती किती सहज आणी बारकावे शोधत असते.यांचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राहुल जांभुळकर यांचे फोटो मनाला भेदून जात असताना आपल्या या वेब पोर्टल च्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यांत आली आहे.




Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर