कर्जत खालापूर विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार,लवकरच उमेदवार घोषित करणार ...
पाताळगंगा न्यूज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : १९ जुलै,
कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देऊन स्वबळावर लढणार असून लवकरच उमेदवार घोषित करणार आहेत.
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांनी आगामी होऊ घातलेल्या निवडणूका ह्या स्वबळावर लढविणार असल्याचे घोषित केले असून महाराष्ट्रातील १०४ विधानसभा मतदार संघाची निवड केली असून या मतदार संघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत, त्याचच हा कर्जत खालापूर मतदार संघ आहे,
कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाची मोठी ताकद असून या आमदार महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग या मतदार संघात आहे, त्यातच राष्ट्रीय समाज पक्षाची संघटना बांधणीही कर्जत आणि खालापूर तालुक्यात मोठी आहेत,
त्याच्याच जोरावर कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढाविणार असून लवकरच उमेदवार घोषित करणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे, आणि रासपा कोकण विभाग अध्यक्ष श्रीकांत भोईर यांनी दिली
0 Comments