ग्रूप ग्राम पंचायत माजगांव १०९० वृक्ष लागवड ,सरपंच दिपाली पाटील यांचा स्तुत्य उपक्रम

 ग्रूप ग्राम पंचायत माजगांव १०९० वृक्ष लागवड ,सरपंच दिपाली पाटील यांचा स्तुत्य उपक्रम 




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
माजगांव / आंबिवली  : ५  जुलै,

            ग्रूप ग्राम पंचायत माजगांव यांच्या माध्यमातून हा परिसर हिरवेगार आणी फळे फुलांनी बहरावे शिवाय पर्यावरणाचा समतोल अबाधित राहावे,यासाठी पेरु,आवळा,सुबाबुळ,साग,बदाम असे १०९० वृक्ष लागवड करण्यात आले.या माध्यमातून रोजगार समवेत ही फळे खाण्यांसाठी उपयोगात येतील. यासाठी ग्राम पंचायतीच्या परिसरातील असलेली स्मशान भुमी,माळराण,रस्त्याच्या दुर्तफा,शाळा येथे हे वृक्ष लागवड करण्यांत आले. 

              ग्रूप ग्राम पंचायत माजगांव या परिसरात माजगांव,वारद,पौध, तसेच अदिवासी वाड्या अश्या विविध ठिकाणी या वृक्षांचे लागवड करण्यात आली.हे वृक्ष लागवड करीत  ग्रामस्थ यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले.वृक्ष आपणांस उत्पन्न बरोबर पर्यावरणाचा समतोल अबाधित राहण्यांस मदत होणार आहे.अनियमित पडणारा पाऊस सुका दुष्काळ या सर्व बाबीचा आभ्यास करून थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला.

             यावेळी  ग्रूप ग्राम पंचायत माजगांव सरपंच दिपाली नरेश पाटील,ग्रामसेवक संदिप धारणे,मा. उपसरपंच राजेश शिवराम पाटील,सदस्या - प्रांजळ प्रदिप जाधव,पुनम प्रकाश जाधव,सरिता कमलाकर वाघे,अर्पणा यशवंत शिंदे,वैशाली नितीन महाब्दी,वंदना सुधाकर महाब्दी,सदस्य  -शशिकांत गजानन पाटील,मधुकर नारायण गायकवाड तसेच को.ऐ.सो. माध्यमिक शाळा माजगांव - मुख्याध्यापक - गौतम कांबळे,सामजिक कार्यकर्ते -नरेश पाटील, सुर्याजी पाटील तसेच,ग्राम पंचायत कर्मचारी - संतोष काठावले,  ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण