सहाय्यक फौजदार कै महेश मधुकर कळमकर यांच्या स्मरणार्थ दिलासा फाउंडेशन हेल्मेट व छत्रीचे वाटप..

 सहाय्यक फौजदार कै महेश मधुकर कळमकर यांच्या स्मरणार्थ दिलासा फाउंडेशन हेल्मेट व छत्रीचे वाटप..




पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा 
खालापूर : ४ जुलै,


               कोरोना योद्धा सहाय्यक फौजदार स्वर्गीय महेश कळमकर यांच्या चतुर्थ स्मृति  दिनानिमित्ताने स्वच्छता दूताना छत्री आणि दुचाकीस्वाराना हेल्मेट चे वाटप दिलासा फाउंडेशन खालापूर तर्फे करण्यात आले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत कर्तव्य बजावत असताना महेश कळमकर यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रायगड जिल्ह्यातील पोलीस दलातील कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले महेश कळमकर हे पहिले पोलीस कर्मचारी होते. महेश कळमकर यांनी वडखळ ,पेण कर्जत ,रसायनी या ठिकाणी नोकरी केली होती. गंभीर गुन्हे असलेले ,कित्येक वर्ष फरारी असलेले आरोपी परराज्यातून आणण्यात महेश कळमकर यांचा हातखंडा होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलासा फाउंडेशन खालापूर  तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. 
                गुरुवारी खालापूर नगरपंचायत सफाई कामगारांना  खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती उमेश गावंड, व्यापारी असिस्ट्रेशनचे अध्यक्ष नरेंद्र शहा, नगरसेविका लता लोते, उज्वला निधी,सामाजिक कार्यकर्ते शेखर जांभळे, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष क्षमा आठवले यांच्या हस्ते छत्री वाटप करण्यात आले. महेश कळमकर यांच्या स्मरणार्थ रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत  दुचाकीस्वारांना हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम  रसायनी पोलीस ठाणे या ठिकाणी घेण्यात आला. 
                 रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय बांगर ,महिला पोलीस उपनिरीक्षक मीनल शिंदे, सहाय्यक फौजदार राजेंद्र सरोदे ,पोलीस हवलदार मंगेश लांगी ,महिला पोलीस कर्मचारी प्रियांका वेळे, प्रियांका कांबळे वडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील ,निकेतन मोधले, पत्रकार दिनकर भुजबळ ,दीपक जगताप, विकी भालेराव दिनेश पाटील ,किशोर साळुंखे, प्रशांत वाघ  यांच्या सह सामाजिक क्षेत्रातील अनेक जण उपस्थित होते. साबाई मंदिर, रसायनी पोलीस ठाणे परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश विचारे यांनी केले आणि आभार दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज कळमकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण