लेखणी देवून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे,धिरज गडगे यांचा पुढाकार,
पाताळगंगा न्यूज : वृत्तसेवा
वडगाव : १० जुलै,
विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असतांना लेखणी खूप महत्व असते,विद्यार्थ्यांच्या जडण -घडणींचा पाया ही लेखणी पासून सुरुवात होते.ज्यांची लेखणी सुंदर त्यांचे त्या विद्यार्थ्यांचे कौतुक होत असते.या सर्व बाबींचा विचार करून रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यर्थ्यांना वर्षभर लेखणी पुरविण्यांचा संकल्प ज्ञानेश्वर वाळकू म्हात्रे व धिरज तुळशीराम गडगे यांनी घेतला आहे.विशेष म्हणजे दर महिन्याला लेखणी वाटप करण्यांत येणार आहे.यामुळे त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र ठिकाणी कौतुक होत आहे.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे लेखनीची ताकद ही जगातील सर्वात मोठी ताकद आहे.त्याच्या या विचारांचा अभ्यास करुन लेखणी देण्याचे काम आज या दोन्ही व्यक्तिमत्त्वांनी केले आहे. एक पेन नसल्यामुळे कोणतेही मुल घरी राहू नये या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यांत आला.प्रत्येक महिन्याला आपणांस लेखणी मिळणार यामुळे विद्यार्थ्यांच्या चहा-यावर समाधान पाहावयास मिळाले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष राठोड, शिक्षक वैजनाथ जाधव सर,विद्यार्थी,पालक,ज्योती ठोंबरे,स्वयं सेविका निकिता,साक्षी,भाग्यश्री व श्रुतिका शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने हा उपक्रम राबविल्यामुळे मनःपूर्वक त्यांचे आभार मानले गेले.
चौकट
मुलांच्या अध्ययनात येणारा अडथळा दूर करण्याचे काम,ज्यांना शक्य होईल त्यांनी केले पाहिजे.दानशूर व्यक्ती प्रत्येक गावातून निर्माण झाले पाहिजे,यामुळे मुलांचा विकास होण्यांस वेळ लागणार नाही.मुले शिकली की आपल्या गावाचे,तालुक्यांचे,जिल्ह्यांचे ,नाव उज्ज्वल होत असते.
सुभाष राठोड,मुख्याध्यापक राजिप शाळा,वडगाव
0 Comments