निवडणूक जवळ आल्याने आमदार भास्कर जाधवांना धनगर समाज आठवला,
भास्कर शेठ धनगर समाज तुमच्या भुलथापांना कधी बळी पडणार नाही - युवा नेते प्रशांत आखाडे
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३० जुलै,
मुबंई येथे काही धनगर समाज बांधवाच्या वतीने मेळावा घेण्यात आला.या मेळाव्याला आमदार भास्कर जाधव व मा.आमदार संजय कदम होते हा मेळावा उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) गटाचा होता.त्यांनी त्या मेळाव्यात समाज बांधवाना मार्गदर्शन करताना अनेक उल्लेख केले.यात धनगर आरक्षनाचीही मागणी त्यांनी केली.मात्र हा मेळावा फक्त समाजातील काही लोक स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी केली असून कोकणातील धनगर समाज हा या मेळाव्याचा निषेध करत आहेत.
कोकणातील उद्धव बाळासाहेब ठाकरे( शिवसेना )गटाचे नेते तथा गुहागर मतदार संघांचे आमदार भास्कर जाधव व मा.आमदार संजय कदम हे गेले अनेक वर्ष राजकारण करत आहेत, त्यांच्या मागे आजपर्यंत धनगर समाज ठामपने उभा आहे, मात्र त्यांनी स्वतःच्या मतदार संघातील समाजाच्या वाड्या वस्त्यावर कधी एक रुपयाचा दिला नाही.समाजाच्या वाड्या वस्त्यांवर रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा आजही पोहचल्या नाहीत,
तुम्हाला कधी धनगर समाज आठवला नाही, किंवा त्यांचा विकास करावासा वाटला नाही,मात्र आता निवडणूका आल्याने तुम्हाला धनगर समाज आठवून आरक्षणाचा प्रश्न आठवला, एवढे वर्ष तुम्ही आमदार आहेत, तुमचे सरकार होते, तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न कसा आठवला नाही, व तुम्ही कधी स्वतःच मतदार संघातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावर कधी निधी का दिला नाही
मात्र आता निवडणूका जवळ आल्याने कोकणातील धनगर समाज आठवला का ? मात्र आता हा समाजही हुशार झाला असून येणाऱ्या काळात तो तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी टीका युवा नेते प्रशांत आखाडे यांनी केली आहे.
0 Comments