जखमी अजगर योग्य उपचारानंतर ,आपल्या अधिवासात पुन्हा सोडले
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : ३१ जुलै,
खोपोली शहरातील भानवज येथे वनखात्याचे कर्मचारी नितीन कराडे, शितल साळुंखे आणि संतोषी बस्तेवाड गस्त घालत असताना दाट झुडपा जवळ पक्षांचा किलबिलाट ऐकण्यांस मिळाला.जवळ जाऊन पाहिले असता तेथे त्यांना अजगर जातीचा साप निदर्शनास आले.शरीरावर जखमा झाल्याने तो मरणासन्न अवस्थेत निपचित पडला होता,त्यामुळे खालापूर तालुक्याचे वनअधिकारी राजेंद्र पवार आणि वनपाल भगवान दळवी यांना या संदर्भात माहिती देण्यांत आली.यावेळी त्या जखमी अजगराला सुरक्षितपणे सर्पमित्र नितेश उर्फ सोनू पवार यांच्या मदतीने खोपोलीतील वनखात्याच्या कार्यालयात आणले गेले.
पशुवैद्य विष्णू काळे यांनी जखमांवर औषध उपचार करून त्याला काही काळ देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला देण्यांत आला.त्यानुसार अजगराला सर्पमित्र दिनेश ओसवाल, अमोल ठकेकर, नवीन मोरे, अभिजीत घरत, सुकृत गोटस्कर, विजय भोसले यांच्या सहाय्याने गुरुनाथ साठेलकर यांच्या निवासस्थानी सुरक्षीत ठेवण्यात आले.
अजगराची वेळेवर देखरेख करणे, त्यास औषधोपचार करणे, त्याचे शरीराची हालचाल करवून घेऊन मसाज करणे, त्याला ऊर्जा मिळावी म्हणून फोर्स फीडिंग अर्थात जबरदस्तीने खाणे भरवणे अशी सेवा करण्यात भक्ती साठेलकर, प्रवीण शेंद्रे व अन्य सर्पमित्रांनी वनअधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यांत येत होते तो संपूर्णतः बरा झाल्याची खात्री झाल्यावर त्याची पुनश्च एकदा वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आले.
0 Comments