थरमॅक्स कारखान्यातील कायम स्वरुपी झालेल्या कामगारांकडून विद्यार्थ्यांस सायकल वाटप

 थरमॅक्स कारखान्यातील कायम स्वरुपी झालेल्या कामगारांकडून विद्यार्थ्यांस सायकल वाटप 



माय मराठी न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : १ मे,
       
          पौध गावजवळ असलेला थरमॅक्स हा कारखाना असून या ठिकाणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ भाई जगताप यांची युनियन आहे.नुकताच येथिल कामगारांना कायम स्वरुपी करण्यांत आल्यांने याच ठिकाणी असलेली कोकण एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा माजगाव येथिल ८ वी वर्गांत शिक्षण घेत असलेल्या ७ मुलींस सायकल वाटप करण्यांत आल्या.हा कार्यक्रम रंगशारदा नाट्य मंदिर, लिलावती हॉस्पीटल जवळ, के. सी. मार्ग, बांद्रा (पश्चिम), मुंबई-५० येथे घेण्यांत आला.
           १ मे आंतराष्ट्रीय कामगार दिन,भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ३६ व्या वर्धापन दिन तथा आमदार भाई जगताप यांचा अभिष्ठचिंतन या दिवशी असल्यामुळे विविध कार्यक्रम हाती घेण्यांत येत असते.तसेच कामगार क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कामगिरी करणा-यांस सन्मानित करण्यांत येत असते.या युनियंच्या माध्यमातून कामगारांस प्रशिक्षण शिबीर चे सुद्धा दर वर्षी आयोजन केले जात असते. 
             या दिवशी आमदार भाई जगताप यांचा अभिष्ठचिंतन असल्यामुळे माझ्या कामगारा समवेत हा दिवस साजरा व्हावा या उद्दात विचारांतून हा कार्यक्रम हाती घेण्यांत आला.यावेळी ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुलींस त्यांच्या हस्ते आणी कामगारांच्या उपस्थितीत ह्या सायकल वाटप करण्यांत आले.यावेळी अध्यक्ष - राजेश पाटील,मंगेश महाब्दि,रामदास पांडुळे,
धनंजय कुलकर्णी,संजय सांगळे,नंदू घरत,निलेश पाटील, 
रणजित भोसले,रघुनाथ रसाळ, चंद्रकांत मुंढे,सुमित शेलार अदि थरमॅक्स चे कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर