सेवानिवृत्त पोलीस विलास पुकळे यांचा सत्कार,

 ज्योतिलिंग सामाजिक बहुउदेशीय संस्था आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने सेवानिवृत्त पोलीस  विलास पुकळे यांचा सत्कार



माय मराठी न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : ३ मे,


        मुबंई पोलीस सेवेतून निवृत्त झालेले मुबंई पोलीस विलास सखाराम पुकळे (मु. पुकळेवाडी, पो. कुकूडवाड, ता. माण जी.सातारा )यांचा ज्योतिलिंग सामाजिक बहूउदेहीय संस्था आणि ऑल इंडिया धनगर समाज रायगड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
        मुबंई पोलीस सेवेत ३६  वर्ष प्रदीर्घ अशी निष्कलंक सेवा बाजावून सेवा निवृत्त झालेले विलास पुकळे यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ  मुबंई येथे आयोजित करण्यात आला होता, विलास पुकळे हे हलवालदार ते उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली होती, त्यांचा नुकताच पदोन्नती सेवा समारंभ पार पडला.
            यावेळी ज्योतिलिंग सामाजिक बहुदेहशिय संस्था आणि ऑल इंडिया धनगर ससमाज कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे, कुर्ला बँकेचे संचालक बाळासाहेब पुकळे, महावितरण अभियंता धनाजी पुकळे, प्रल्हाद पुकळे, आबासाहेब पुकळे, बीएमसी अधिकारी नाना पुकळे, लक्ष्मण शेळके, नितीन शेळके, बाळासाहेब शेळके, पोपट शेळके तुषार पुकळे आदिसह अनेक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

संतोष शिंगाडे यांना आरडीसी बॅंक च्या वतीने जिल्हा स्तरीय पुरस्कार जाहिर