जागतिक आदिवासी दिनानिमित्त टाटा स्टील कंपनी मार्फत शाळकरी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू वाटप
पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : १० ऑगस्ट,
आदिवासी समाज केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये लोक राहतात. ज्यांची जीवनशैली, खाण्याच्या सवयी आणि चालीरीती सामान्य लोकांपेक्षा भिन्न असलेल्या दिसून येत असतात. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटल्यामुळे आजही अनेक आदिवासी समाजातील लोक मागासलेले आहेत. त्यामुळेच भारतासह अनेक देशांमध्ये त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांकडे लक्ष वेधण्यासाठी ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो.
अश्यास प्रकारे या समाजातील मुळे शिक्षणापासून वंचित राहू नये हा प्रामाणिक विचार करत टाटा स्टील खोपोली एच.आर डिपार्टमेंट आणि साई डिलाईट फूड्स यांच्या संयुक्त विद्यमाने खोपोली
नगरपरिषद शाळा क्रमांक ५/मुळगाव ठाकूरवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले.
यावेळी स्थानिक माजी नगरसेवक राजू डूमणे , माजी नगरसेविका लीला डूमणे , शाळेचे मुख्याध्यापक धानिवले सर , उपशिक्षक संतोष म्हस्के सर तसेच टाटा स्टीलचे निखील कुजुर , निखिल रीठे , अशोक मावलांकर , सुभाष गायकवाड यांसह एच.आर डिपार्टमेंट उपस्थित होते. यावेळी घेण्यात आलेल्या शालेय उपयोगी वस्तूं वाटपाच्या कार्यक्रमांमध्ये जगातील आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देत सर्व विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची मदत लागल्यास ती कायम पुरवली जाईल याबाबत टाटा स्टील डिपार्टमेंट यांच्या वतीने सांगण्यात आले..
0 Comments