खोपोलीत जागतिक मांजर दिन उत्साहात साजरा
पाताळगंगा न्युज : गुरुनाथ साठेलकर
खोपोली : १० ऑगस्ट,
मांजर या प्राण्याला उंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वी पाळले जात असे मात्र हल्ली मांजर पाळणे ही फॅशन झाली आहे. कुत्र्यांपेक्षाही जास्त प्रमाणात मांजर हा प्राणी घरोघर पाळला जात असून त्याच्या विविध प्रजाती आहेत. पूर्वी सर्रास आढळणारी मांजरे आजकाल हजारो रुपये मोजून आवडीने पाळली जात आहेत. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मांजर या प्राण्याला कुटुंबाचा घटक मानला जात असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर ८ ऑगस्ट हा दिवस "जागतिक मांजर दिन" म्हणून पाळला जातो.
त्याच निमित्ताने "फेलिन क्लब ऑफ इंडिया (FCI)" या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली श्री कृपा एक्वेरियम आणि पेट क्लिनिक येथे खोपोलीतील मांजर मित्रांनी एकत्र येत सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ड्रूल्स पेट फूड, हिमालया हेल्दी पेट फूड, टाइयो, ऑरेंज पेट, सिग्नेचर सारख्या नामवंत पेट फूड कंपन्यांकडून मांजरासाठी फूड पॅकेट्स भेट स्वरूपात दिले गेले. सावा वेट (SAVA VET) या पशु औषध बनवणाऱ्या कंपनीकडून मंजरांसाठी निर्जंतुकीकरणाच्या औषधांचा देखील भेट वस्तूत समावेश होता. खोपोलीतील दोनशेहून अधिक जणांनी आपल्या लाडक्या मांजरासह समारोहात सहभाग नोंदवला होता. त्यावेळी मांजराचे आवडीचे खाद्य, खेळणी आणि आरोग्य परीक्षण या संदर्भात मार्गदर्शनही करण्यात आले.
खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक किशोर पानसरे यांच्या हस्ते केक कापून मांजर दिनाची सुरुवात केली. श्री कृपा एक्वेरियमचे प्रवीण शेंद्रे, हेल्प फाऊंडेशन - अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, रेणूका घुडे(drools), राजेंद्र बिल्ला(signature), संदेश जाधव(grain zero), चिराग निर्भवणे(Orange pet) यांच्यासह सुफियान शेख, अस्मित पाटील, वैष्णवी चव्हाण, आली भाई इत्यादी कॅट ब्रीडर व इंटास कंपनीचे प्रतिनिधी यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता.
0 Comments