धनगर समाजाचा मेळाव्याचे आयोजन,शिवसेना नेते माजी मंत्री रामदास भाई कदम करणार मार्गदर्शन
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २२ ऑगस्ट,
कोकणातील धनगर समाजाच्या वाडी वस्तीवरील विकासाला चालना मिळण्यासाठी आणि समाजातील युवकांना योग्य दिशा मिळावी यासाठी धनगर समाजाचे वतीने मेळावा आयोजित केला असून हा मेळावा रविवार २५ ऑगस्ट रोजी पाटीदार समाज हॉल (घाटकोपर मुबंई )येथे आयोजित करण्यात आला असून या मेळाव्याला शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, आमदार योगेश कदम हे मार्गदर्शन करणार आहेत.
कोकणातील धनगर समाजाच्या वाड्या वस्त्या ह्या आजही मूलभूत सुविधा पासून वंचित आहेत, त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या विकासाला चालना मिळावी तर युवकांना योग्य दिशा देण्यासाठी ह्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, तरी या मेळाव्याला कोकणातून समाज बांधवानी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी यांनी केले आहे
0 Comments