बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा खोपोलीत तीव्र निषेध

 बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेचा खोपोलीत तीव्र निषेध. आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे शिवसेनेची मागणी. डॉ. सुनील पाटील



 पाताळगंगा न्युज :  शिवाजी जाधव 
खोपोली : २२ ऑगस्ट,


               बदलापूर येथिल आदर्श शाळेमध्ये मन शून्य करणारी घटना घडली शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेमध्ये आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरातून सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख डॉ. सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शितक राऊत यांना निवेदन देऊन आंदोलकांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
         बदलापूर च्या या घटनेमुळे सतप्त जमावांनी थेट स्टेशनमध्येच आंदोलन करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. कोलकत्ता बलात्कारातून प्रकरणातून देश अजून सावरला नसताना बदलापूर येथे घडलेल्या घटनेने सगळ्यांनच्याच जीवाला धक्का बसला होता. बदलापूर प्रकरण उघडीस आल्यावर सगळीकडे तीव्र प्रतिक्रिया येत आहे आरोपीला लवकरात लवकर पकडून शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरांकडून होत आहे 
             या वेळी खोपोली येथिल शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुष्पहार अर्पण करून शिवस्मार्कसमोर तीव्र आंदोलन केले. त्यानंतर बदलापूर प्रकरण बाबत आरोपीला लवकरात लवकर पकडून फाशी द्यायची अशी मागणी पोलीस स्टेशन ला निवेदन देण्यांत आले.

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर