विक्रमवीर रायगड भुषण डॉ.शेखर जांभळे नॅशनल हिरो सन्मानाने सन्मानित

 विक्रमवीर रायगड भुषण डॉ.शेखर जांभळे नॅशनल हिरो सन्मानाने सन्मानित




पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : २१ ऑगस्ट,

             सामाजिक कार्यात अविरत सेवेत २४ वर्षीय सातत्यपूर्ण  कार्यरत असणारे डॉ.शेखर जांभळे यांना स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून बुज हास्य क्लब ऑफ खोपोली तर्फे मानाचा नॅशनल हिरो पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. आपल्या नावासोबत नेहमी आईचे नाव लिहिणारे डॉ.शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी हा पुरस्कार आपल्या आईच्या विचारांतून   स्वीकारला त्यांचे कार्य अतुलनिय असल्यामुळे  त्यांना मिळालेला पुरस्कार ही त्यांच्या कामाची पोचपावती 
             यावेळी हास्य क्लबचे संस्थापक बाबुभाई ओसवाल,थोर कीर्तनकार व अध्यात्मिक गुरु ह.भ.प. रामदास महाराज पाटील, उद्योजक सुनील गुप्ता, लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष दीपेंद्रसिंह भदोरिया,माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर,खोपोली तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रशांत माने,परळी जांभूळपाडा लोहाना महाजन समाजाचे अध्यक्ष शैलेश विठलानी तसेच शेकडो हास्य क्लब सदस्य,शहरातील नामवंत उद्योजक,विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी,पत्रकार व नागरिक यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक हा पुरस्कार दि.१५  ऑगस्ट २०२४ रोजी लोहाना समाज हॉल खोपोली येथे देण्यात आला. 
              यावेळी सहज सेवा फाउंडेशनचे खजिनदार संतोष गायकर,महिला संघटिका नीलम पाटील,
जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी,तालुकाध्यक्ष मोहन केदार,योगिता जांभळे,निहारिका जांभळे यांच्या सोबत हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.यावेळी समाजातील विविध स्तरातून काम करणाऱ्या व्यक्तींचा देखील सन्मान करण्यात आला.डॉ. शेखर जांभळे यांची सुरुवात रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या माध्यमातून झाली.तिथूनच त्यांच्या खऱ्या अर्थाने सामाजिक जीवनाला सुरुवात झाली.रोट्रॅक्ट क्लब ऑफ खोपोलीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी वाहिल्यानंतर लायन्स क्लब ऑफ खोपोली मध्ये सदस्यता घेतली.
          त्यांनी २०१५ - १६  रोजी त्या ठिकाणी आपला समाजकार्याचा दबदबा राखीत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,इंडीया बुक ऑफ रेकॉर्ड ,आशिया बुक ऑफ रेकॉर्ड सारख्या उपक्रमातून आपल्या नेतृत्वाची,कर्तृत्वाची व कल्पकतेची चुणूक साऱ्या जगाला दाखवून दिली.विशेष म्हणजे नोकरी सांभाळून समाजकार्य करणाऱ्या डॉ.शेखर जांभळे  यांनी २०१६  नंतर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि यासोबतच करीत असलेली  समाजसेवा आहे त्यापेक्षा अधिक पट करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्यांना समाजामध्ये वेगळे स्थान देऊन गेला.
        एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ.शेखर जांभळे यांच्याकडे बघितले जाते .रायगड जिल्हा परिषदेचा मानाचा रायगड भूषण पुरस्कार मिळविताना सामाजिक कार्यातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना २०१६  साली सिंगापूर येथे मानद डॉक्टरेट प्राप्त झाली आहे. स्व.आनंद दिघे व बाबा आमटे यांना गुरुस्थानी मानून डॉ.शेखर यांच्या सातत्यपूर्ण सेवेचा समाजाला मोठा आधार झाला आहे.
          त्यांनी स्थापन केलेल्या सहजसेवा फाउंडेशन संस्थेमार्फत नगरपालिका दवाखाना येथे सहा वर्षापासून सुरू असलेली निःशुल्क अन्नसेवा,निधन झालेल्या व्यक्तींना घरापासून स्मशानापर्यंत सोडण्यासाठी असलेली निःशुल्क स्वर्गरथ सेवा, 
निधन झालेल्या व्यक्तींसाठी निःशुल्क शवपेटी,साधारण २०० पेक्षा जास्त जोडप्यांचे निःशुल्क सामुदायिक विवाह,नदी पूजन ,शाळा कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण, सायबर क्राईम मार्गदर्शन, अपंग व्यक्तींना निःशुल्क हात पाय बसून देणे यासारखे विविध उपक्रम राबवत असतात. त्यांच्या संस्थेमार्फत वीट भट्टी कामगारांसाठी चालवली गेलेली झाडाखालची शाळा महाराष्ट्रातील ऐतिहासिक शाळा ठरली. विट भट्टी कामगारांच्या मुलांसोबत झाडाखाली केलेला स्वातंत्र्य दिन कार्यक्रम हा भारतातील विश्व विक्रम ठरलेला आहे.
तुरुंगातील,दवाखान्यातील पुस्तकांची लायब्ररी,कोरोना काळातील पेशंटसाठी असलेली पुस्तक लायब्ररी,साधारण ४०,००० जेवणाचे पॅकेट्स कोरोना काळात गरजूंना वाटले गेले. यासोबत कोरोना झालेल्या कर्जत खालापूर तालुक्यातील पेशंटला घरपोच जेवण व त्यांच्या नातेवाईकांना मदत हे या संस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे.
           त्यांच्यामार्फत चालणाऱ्या अनेक सेवा सातत्यपूर्ण सुरु असतात आणि ही व्यक्ती सामाजिक कार्य करतांना थकत कसे नाही हे खोपोलीकरांना नव्हे तर सर्वांनाच अप्रूप आहे.रात्री अपरात्री २४  तास जनतेच्या सेवेत रुजू असलेले डॉ. शेखर जांभळे हे काम सामाजिक बांधिलकी मानून करतात.सामाजिक कार्यातून आजवर ८ ) विश्वविक्रम स्थापन करणारे डॉ.शेखर जांभळे विक्रमवीर म्हणून देखील ओळखले जातात.नुकतेच त्यांचे राजकारणातील पाऊल हे भविष्यात खोपोलीला विकासाचे वळण देणारे आहे. खोपोली खालापूर संघर्ष समितीच्या माध्यमातून नुकतेच सुरू केलेले कार्य हे शहर व तालुकाप्रती अतुलनीय असून तालुक्यात यामुळें आगळावेगळा बदल झालेला दिसत आहे.
         ;डॉ.शेखर जांभळे हे समाजातील अनंत घटकांना मदत करणाऱ्या आशीर्वादाचे धनी आहेत,सामाजिक कार्य,राजकारण,पत्रकारिता व विविध क्षेत्रात काम करताना सर्वांना सोबत घेवुन काम करण्याच्या स्वभावामुळे डॉ.शेखर जांभळे हे समाजासाठी नक्कीच आदर्श आहेत असे प्रतिपादन सहज सेवा फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष मोहन केदार यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण