स्वराज्य ग्रुप ने घेतले अष्टविनायक दर्शन

 स्वराज्य ग्रुप ने घेतले अष्टविनायक दर्शन



पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा                                                  खालापूर  : १३  ऑगस्ट, 

            खालापूर तालुक्यातील स्वराज्य ग्रुप ने श्रावण महिन्यातील पहिल्याच आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील असलेले अष्टविनायकांचे दर्शन घेतले.महड येथिल असलेले वरद विनायक यांचे दर्शन घेवून लेण्याद्री गिरिजात्मज,ओझर - विघ्नेश्वर ,थेऊर- चिंतामणी,, रांजणगाव - महागणपती,सिद्धटेक-सिद्धिविनायक,मोरगाव - मयुरेश्वर/मोरेश्वर,पाली- बल्लाळेश्वर,यांचे दर्शन घेवून पुन्हा महड येथिल वरद विनायकांचे दर्शन घेवून सांगता करण्यांत आली.गणपती  म्हणजे विद्येची देवता आणी या देवतेचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होत असतात.म्हणून देशाच्या अनेक ठिकाणाहून भक्त गण येत असतात.                                 



        प्रत्येक गणपतीची वेगवेगळी कथा असल्यामुळे त्याच्या सगुण रूपाच्या दर्शना बरोबर येथील पूर्व इतिहासाची माहिती मिळत असते.येथिल परिसर ,अल्हादायक  असल्यामुळे मनाला समाधान मिळत असते.विशेष करून पावसाला मध्ये अनेक ठिकाणी चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असते. सर्वत्र ठिकाणी पसरलेली हिरवी गर्द झाडी डोंगरांनी परिधान केलेला हिरवा शालू असे मनमोहक दृश्य मानवी मनाला आनंद देत असतो.     


                                 
    या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांच आठवड्यात अष्टविनायक दर्शन घेतले.शिवाय या महिन्यामध्ये पावसाचा जोर कमी होत असल्याने निसर्गाने शुंगार केलेला हिरवा शालू आणी आश्या वातावरणामध्ये अष्टविनायकांचे दर्शन घेतल्याने मनाला समाधान लाभत असते.असे मत अनिल भगत,शरद देशमुख,नितिन काठावले,अमोल मालकर,चंद्रकांत कोंडीलकर,महादेव गडगे ,कृणाल मालकर,योगेंद्र प्रसाद,हरिचंद्र वाघे,संतोष वाघे,अमोल मालकर अनंता हिलम,महादु वाघे,गणेश वाघे,यांनी पाताळगंगा न्युज शी बोलतांना सांगितले.  






Post a Comment

0 Comments

बेचकीच्या अचुक लक्षवेध ठरला तिसरीचा विद्यार्थी  सोहम पवार