साजगाव फाटा ते महड येथिल रस्त्याची दुरवस्था

 साजगाव फाटा ते महड येथिल रस्त्याची दुरवस्था 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खोपोली : १७ ऑगस्ट,
  
             रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक पैकी असलेले महड येथिल वरद विनायक गणपती या मंदिराकडे जाणारा रस्त्याची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे या मार्गावरुन गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जातांना जणू तारेवरची कसरत करावी लागत आहे.मात्र हा रस्ता दुरुस्ती करण्यांसाठी जाणीव पुर्वक दुर्लक्ष करीत असल्यांचे पहावयांस मिळत आहे.याच ठिकाणी धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या पाताळगंगा नदिच्या किणा-यावर दशक्रिया होत असते.मात्र असे असले तरी सुद्धा हा रस्ता खड्यात आहे. की खड्यात रस्ता अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.
             तालुक्यातील ग्रामीण भागांतील गावांना जोडणारे रस्ते जवळ - उत्तम प्रकारे होत असतात.तर काही रस्त्याची दुरवस्था निर्माण झाली आहे.मात्र हे रोजचे आहे.मात्र असे असले तरी सुद्धा या कडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष होत असतांना यांचा नाहक त्रास कामगार,वयोवृद्ध,शाळकरी मुले,अश्या अनेकांना यांचा  त्रास सहन करावा लागत आहे.यामुळे अनेकांना कमरेचा त्रास होत असल्यांचे निदर्शनास येत आहे.
            महड हे अष्टविनायक पैकी गणपती म्हणून प्रचलित असून याच दैवस्थानांच्या ठिकाणी जाणा-या रस्त्याची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे येथून प्रवास करणारे भक्त गण नारजी व्यक्त करीत आहे.हा मार्ग नजदिक असल्यामुळे कामगार शाळकरीमुले यांच मार्गाचा अवलंब केला जात आहे.परिणामी रस्त्यावर निर्माण झालेले हे खड्डे अनेकांना शरिरिक व्याधीची समस्या निर्माण करुन देत आहे.

Post a Comment

0 Comments

बांधकामंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त चौकमध्ये रक्तदान शिबिर, सरपंच रितू ठोंबरे यांनी केले रक्तदान