तालुक्यातील भात शेतीची शास्त्रज्ञ डॉ.जीवन आरेकर व कृषी अधिकारी यांच्याकडून पाहणी,शेतक-यांस मार्गदर्शन

 तालुक्यातील भात शेतीची शास्त्रज्ञ डॉ.जीवन आरेकर व कृषी अधिकारी यांच्याकडून पाहणी,शेतक-यांस मार्गदर्शन 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २० ऑगस्ट,

       मागिल आठवड्यापासून पावसांनी मौन धारण केल्यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त झाले होते.पावसांने हजेरी लावली मात्र भात पिकावर खोडकिड्‌याचा प्रादुर्भाव तसेच सुरळीतील अळीचा झाल्यामुळे भात पिकाची पाहणी करण्यांसाठी तालुका कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांनी तालुक्यातील आपटी व तळवली या गावात जाऊन व भात पिकांची पाहणी करुन भात पिंकावर आलेले खोडकिडा संदर्भात मार्गदर्शन केले.
           सदर कीटक शास्त्रज्ञ कोकण कृषी वि‌द्यापीठ दापोली डॉ.जीवन आरेकर यांनी भात पिकावरील सुरळीतील अळी या किडीचे नियंत्रण करण्यासाठी  शेतातील पाणी शक्य असल्यास काढून टाकावे व नंतर पन्नास टक्के ॲसिफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी दोन ग्रॅम प्रति लिटर किंवा डेल्टामेथ्रीन 1.8% प्रवाही 650 मिली किंवा कारट्याप हायड्रोक्लोराइड 50% प्रवाही 600 ग्रॅम प्रति पाचशे लिटर पाणी या प्रमाणात प्रती हेक्टर फवारणी करावी.
          तसेच पिवळ्या खोडक्याच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतात पुरेसा ओलावा असेल तर कारट्याप हायड्रोक्लोराइड चार टक्के दाणेदार 18.75 किलो हेक्टरी वापरावे किंवा पिप्रोनील 0.34% दाणेदार 20.80 किलो प्रती हेक्टरी वापरावे फवारणीसाठी कारट्याप हायड्रोक्लोराइड 20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे किंवा क्विनॉलफॉस २० मिली प्रति दहा लिटर पाण्यातून फवारावे असे मार्गदर्शन करण्यांत आले. 
           यावेळी तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन केले, की शास्त्रज्ञांनी केलेल्या शिफारशी प्रमाणे सुरळीतील अळी व पिवळा खोडकिड्याचे नियंत्रण करावे तसेच भात शेती वर आलेल्या खोडकिडा पाहणी करण्यांसाठी मंडळ कृषी अधिकारी नितीन महाडिक,कृषी पर्यवेक्षक सुरेश उघडा, कृषी सहाय्यक आर बी आंधळे तसेच शेतकरी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण