खरिवली येथे काल्यांच्या किर्तनांतून,अखंड हरिनामांची सांगता

 खरिवली येथे काल्यांच्या किर्तनांतून,अखंड हरिनामांची    सांगता 




पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खरिवली : २०  ऑगस्ट,

          खरिवली येथिल ग्रामस्थ,वारकरी  एकत्र येवून अखंड हरीनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने आणि भक्ती भावने साजरा करण्यात आला. विठ्ठल रखुमाई मंदिर येथे  ४९ वर्ष हा सोहळा सुरु असून ,परमपूज्य आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. रामदास ( भाई )महाराज पाटील, ( गुरुकुल संस्था महड ) यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली,ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ,भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यांत आले होते.
          या ठिकाणी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार म्हणून ह.भ.प. हर्षलाताई मगर (टिटवाळा) ह.भ.प.महेश महाज साळुंखे (पाटनोली) तसेच संपूर्ण सप्ताहाचे व्यासपीठ युवा किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येत होते.शेवटच्या  दिवशी दिपोत्सवासाठी सामाजिक,सांस्कृतीक,शैक्षणिक, राजकिय अशा विविध क्षेत्रातील  मान्यवर व्यक्ती आणि वारकरी संप्रदाय येथील थोर कीर्तनकार यांच्या माध्यमातून दीप प्रज्योलीत करण्यात आला.यावेळी उपस्थितानी आपले मनोगत व्यक्त केले.आणी दीपोत्सव प्रज्योलीत करून आणि ज्ञानेश्वराच्या पसायदानाने या कार्यक्रमाने सांगता करण्यात आली.
          गेले सात दिवस अखंड भजन,क़िर्तनाच्या माध्यमातून या ठिकाणी चैतन्य निर्माण झाले. दीपोत्सव  दिवशी गावातून भव्य - दिव्य  दिवशी पायी पाळखी दिंडी सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच काल्यांचे किर्तन ह.भ.प रामदास ( भाई )महाराज पाटील ( गुरुकुल संस्था महड )यांचे झाले 

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर