आदिवासी महिलांनी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांना राखी बांधून केले रक्षाबंधन

 ओलमण आणि झुगारेवाडी येथील आदिवासी महिलांनी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांना राखी बांधून केले रक्षाबंधन सण साजरा 


 नितीन सावंत यांनी आदिवासी महिलांसोबत रक्षाबंधन साजरा केल्याने महिलांचा आनंद द्विगुणित 


पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : २१ ऑगस्ट,


       नितीन सावंत यांनी उपजिल्हाप्रमुख पदाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून १००% समाजकारण करण्याचे ठरविले.विविध विकास कामे करुन अदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावल्यामुळे,आदिवासी महिलांनी आपल्या हक्काचा भाऊ मिळाला असता त्या अनुषंगाने आज रक्षाबंधनाचे औचित्य साधून नितीन सावंत यांना राखी बांधण्यात आल्या. साधारपणे ३६० हुन अधिकच्या महिलांनी राखी बांधत भावा बहिणीचे नाते अधिक दृढ करत पवित्र सण साजरा केला.
                शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हटल की, ८०% समाजकारण आणि २०% राजकारण. परंतु जेव्हा पासून ग्रामीण भागात जनसंपर्क वाढवित आदिवासी बांधवांना पाण्यांचा प्रश्न मार्गी लावून तहान भागविली. तर गेल्या वर्षी साधारणपणे अनेक भागात पाणी टंचाई असताना कळंब जिल्हा परिषद विभागातील १६ आदिवासी वाड्यांचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावल्याने आदिवासी बांधवांनी नितीन सावंत यांना आपला भाऊ मानायला सुरूवात केली.परिणामी अनेक विभागातील पक्ष प्रवेश, त्याचबरोबर विविध भागातील विकासकामे विधानपरिषद आमदारांच्या निधीतून पूर्ण करून कित्येक प्रश्न मार्गी लावले, 
              यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुका संघटक बाबू घारे, रायगड जिल्हा ठाकूर संघटना अध्यक्ष मालू निरगुडा, ग्राहक संरक्षण तालुका सरचिटणीस, प्रदीप देशमुख, उपतालुकाप्रमुख असीम बुबेरे, उपतालुकाप्रमुख बाजीराव दळवी, कळंब विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, पाथरज विभागप्रमुख गणेश दळवी, कळंब पंचायत समिती विभाग प्रमुख संतोष बदे, प्रदीप मोरे सामाजिक कार्यकर्ते, ओलमण ग्रामपंचायत प्रमुख राघो निरगुडा, ओलमण शाखाप्रमुख विनोद पादिर, झुगारेवाडी शाखाप्रमुख हेमंत पारधी, महिला आघाडी शाखा संघटक कविता पारधी, चई उपशाखा प्रमुख पांडुरंग भोले,विष्णू झुगरे, दत्तू झुगरे, दिनेश भोईर, गीता पादिर, चांगुणा पादिर यांच्यासह अनेक शिवसेना - युवासेना, महिला आघाडीचे विभागातील अनेक आजी - माजी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
           शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी अतिदुर्गम भागातील आदिवासी महिला भगिनींन समवेत रक्षाबंधन सण साजरा केल्याने महिला भगिनींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहायला मिळाला असून याप्रसंगी आदिवासी महिला भगिनींनी आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना केली. तर यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी महिला भगिनींचे आभार मानत पुढील काळात आपला लहान व मोठा भाऊ म्हणून आपल्या सुखदुःखात कायम सोबत राहून आपल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी निस्वार्थपणे काम करून भावाची जबाबदारी मी प्रामाणिकपणे बजावीन असे उपजिल्हाप्रमुख सावंत म्हणाले.



Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण