खालापूर येथिल ग्रामस्थांचे पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय,नगर पंचायत यांस बदलापूर येथिल घटनेच्या निषेधार्त निवेदन
पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा
खालापूर : २२ ऑगस्ट,
बदलापूर मध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत झालेल्या आत्याचाराच्या निषेधार्त खालापूर शहरातील नागरिकांनी प्रभारी तहसीलदार, खालापूर पोलीस स्टेशन, नगरपंचायत व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे निवेदन देत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनात करण्यांत आली.
समाजात वारंवार होतं असलेल्या अश्या घटनेच्या अनुषंगाने खालापूर मधील जागृत महिला व नागरिकांनी खालापूर तहसीलदार, खालापूर पोलीस स्टेशन, खालापूर नगरपंचायत व स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे निवेदन देत आपल्या परिसरातील सी.सी. टीव्ही कॅमेरे व खालापूर पोलीस स्टेशन मधील फिरते दामिनी पथक याबाबत चर्चा करून दामिनी पथकाच्या फेऱ्या शालेय वेळेत सूरु ठेवण्याची मागणी करण्यांत आली.
तसेच सी.सी.टीव्ही कॅमेरे जे बंद असतील ते सुरु करावेत व जिथे जिथे गरचेचे आहेत तिथे बसवण्याची विनंती केली.या वेळी खालापूर शहरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments