राजिप शाळा तांबाटी,खरीवली शैक्षणिक साहित्य वाटप,लायन्स क्लब खालापूर,चा पुढाकार

 राजिप शाळा तांबाटी,खरीवली शैक्षणिक साहित्य वाटप,लायन्स क्लब खालापूर,चा पुढाकार 








पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
खालापूर : २४ ऑगस्ट,

           लायन्स क्लब सातत्याने विविध उपक्रम राबवित असतांना नागरिकांच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकत ,आरोग्य शिबीर रक्तदान,अपंग व्यक्तीस साहित्य वाटप,त्याच प्रमाणे तालुक्यातील असलेल्या रायगड जिल्हा शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची कमतरता भासू नये यासाठी लायन्स चे सर्व पदाधिकारी सातत्याने मेहनत घेत आहे.यासाठी खालापूर तालुक्यातील राजिप शाळा तांबाटी,तसेच खरीवली  या शाळेत हे शैक्षणिक साहित्य समवेत खावू  वाटप करुन विद्यार्थ्यांच्य चेह-यावर समाधान पहावयांस मिळाले.

         यावेळी दोन्ही शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांना  शैक्षणिक साहित्यांचा लाभ घेतला.हे साहित्य जीएसटी हेड लायन विजय गनात्रा,प्रोजेक्ट हेड मा लायन हरिभाऊ जाधव  यांनी उपलब्ध करुन दिले. ग्रामीण भागात,डोंगराळ भागात असलेल्या शाळा मध्ये विद्यार्थ्यांची स्थिती उत्तमच असते असे नाही.मात्र त्यांना शैक्षणिक आधार मिळावा या उद्दात विचारांतून गेले लायन्स क्लब सातत्याने या शाळेच्या पाठीशी उभे असून त्यांना लागणारे साहित्य देण्यांचे काम सातत्याने करीत आहे.

             यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष  शिवानी ताई जंगम ग्रूप ग्राम पंचायत तांबाटी सरपंच अविनाश आमले, लायन खजिनदार किशोर नामदेव पाटील लायन,अशोक पाटील महेंद्र सावंत, कांचन ताई जाधव व सर्व ग्राम पंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व शिक्षक वृंद गावातील प्रतिष्ठित नागरिक व विध्यार्थी वर्ग उपस्थित होते.महेंद्र सावंत अदि उपस्थित होते.तसेच सूत्र संचलन शिक्षक गाडे गुरुजी यांनी केलं व आभार प्रदर्शन मा ग्रामविकास अधिकारी यांनी केलं




Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण