अल्काईल अमाईन्स राजिप शाळा वडगाव १० संगणकाची सुसज्य लॅब भेट

 अल्काईल अमाईन्स राजिप शाळा वडगाव १० संगणकाची सुसज्य  लॅब भेट


अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड सी.एस.आर.फंडातून जिल्हा परिषद वडगाव शाळेला १० संगणकाची सुसज्य लॅब भेट.



पाताळगंगा न्युज :  वृत्तसेवा 
वडगाव : २५ ऑगस्ट,

        अल्प वधीतच नावारुपाला आलेली रायगड जिल्हा परिषद शाळा वडगाव,विद्यार्थ्यांना सुसज्य अश्या सोयी या ठिकाणी निर्माण केल्यामुळे इंग्लिश मेडीयम मध्ये शिकणारी मुले मराठी शाळेत दाखल झाली आहेत.यामुळे शाळेची पट संख्या शंभरी पार केली आहे.त्यातच या ठिकाणी आठवी वर्ग सुरु केल्यामुळे शाळेसाठी अनेक संस्था सहकार्य करीत आहे.पाताळगंगा परिसरात असलेले अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड यांनी सी.एस.आर.फंडातून जिल्हा परिषद वडगाव शाळेला १० संगणकाची सुसज्य लॅब भेट देण्यांत आली.

            त्याच बरोबर अल्काईल अमाईन्स शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून ७ वी उत्तीर्ण झालेल्या प्रथम मंथन ठोंबरे,द्वितीय आर्या कोंडीलकर आणि तृतीय  क्रमांकाच्या कृतिका गडगे या  विद्यार्थ्यांचा शालेय किट देऊन गौरवण्यात आले. या योगदानाबद्दल आणि वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापक यांनी आभार मानले.या लॅब पासून विद्यार्थ्यांना मोठा लाभ होणात असून तालुक्यात प्रथमच मराठी शाळेला संगणक लॅब असल्यांचे पहावयांस मिळत आहे.
                या संगणक कक्षाचे अनावरण अल्काईल अमाईन्स केमिकल्स लिमिटेड, पाताळगंगा येथील एच आर. प्रमुख मा.अर्चना माने,मा.सरपंच वडगाव ग्रुप  ग्रामपंचायत मा.गौरी गडगे,मा.केंद्र प्रमुख मा.जे.पी. परदेशी साहेब,सी.एस.आर.कन्सल्टंट रविंद्र ओंकार, आणि मुख्याध्यापक सुभाष राठोड ,सह शिक्षक वैजनाथ जाध,पदविधर शिक्षण सेविका मयुरी धायगुडे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष करुणा ठोंबरे,उपाध्यक्ष राजश्री जांभुळकर तसेच शाळा व्यवस्थापन,सदस्य,स्वयं सेविका आणि पालकमोठ्या संख्येने  उपस्थित होते.

       
 चौकट    
या वर्षापासून या शाळेत ८ वी चा वर्गही सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना या संगणकाचा लाभ घेता येईल. त्याच बरोबर शाळेच्या पट संख्यानी शंभरी पार केली आहे. 
मुख्याध्यापक राजिप शाळा वडगाव  - सुभाष राठोड 
    

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर