आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेचे पदाधिकारी गावागावात जाऊन विकास कामांचा घेतला आढावा

 आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेचे पदाधिकारी गावागावात जाऊन विकास कामांचा घेतला आढावा



खालापूरात शिवसेनेच्या जनसंपर्क दौरा अभियानाला शिवसैनिकांचा उदंड प्रतिसाद,गावागावातील लोकांनी केले शिवसैनिकांचे जंगी स्वागत (आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेचे पदाधिकारी गावागावात जाऊन विकास कामांचा घेतला आढावा

 पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे 
खोपोली / वावोशी : २२ ऑगस्ट 


          आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे खालापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल पासून खालापूर तालुक्यातील गाव खेड्याला भेट देत तेथे झालेल्या विकास कामांचा तसेच प्रलंबित विकास कामांचा आढावा घेऊन शिवसैनिकांना योग्य मार्गदर्शन केले. शिवसेनेच्या वतीने हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे स्वतः सहभागी होणार होते मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कालच्या दौऱ्यात सहभागी झाले नसल्याचे सांगण्यात आले.ते स्वतः या दौऱ्यात शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.काल पासून सुरू झालेला हा दौरा पुढे तीन दिवस चालणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.
               या दौऱ्यामध्ये खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद विभाग व खालापूर नगरपंचायत विभाग समाविष्ट करण्यात आलेला आहे.आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेणे व प्रलंबित विकास कामांच्या बाबत सकारात्मक दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे.
           या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाल्याने दौऱ्याला भगवे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शिवसेनेचा हा दौरा काल मंगळवारी सुरू होऊन शुक्रवारी संपणार आहे.या दौऱ्याचे नियोजन करताना काल मंगळवारी १८ गावे, बुधवारी १९ गावे,गुरुवारी १५ गावे व शुक्रवारी १९ गावांचा जनसंपर्क दौरा करण्यात येणार असून या दौऱ्याचे नियोजन करून तशी निमंत्रण पत्रिका गाव खेड्यामध्ये पोहच करण्यात आली आहे.

____ कोट---
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने ते खालापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.
काल पासून सुरू झालेल्या दौऱ्यात आमदार प्रकृती अस्वास्थ्यामुळे सहभागी होऊ शकले नाहीत.या दौऱ्यात ते स्वतः शिवसैनिकांशी बोलून गावपातळीवरील झालेल्या विकासाची माहिती घेऊन प्रलंबित विकास कामांच्या बाबतीत चर्चा करणार आहेत.असे एकही गाव नाही जेथील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार नाहीत.सर्व शिवसैनिकांना आवर्जून ते भेटणार असल्याने शिवसैनिक सुध्दा या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
___विजय भाऊ पाटील
शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर