होराळे येथे अखंड हरिनाम सप्ताह,आरोग्य तपासणी सह योग शिबीरांचे आयोजन

 होराळे येथे अखंड हरिनाम सप्ताह,आरोग्य तपासणी सह योग शिबीरांचे आयोजन 





पाताळगंगा न्युज : वृत्तसेवा 
होराळे : २५ ऑगस्ट, 

           श्री विठ्ठल रुक्मीणी मंदिर, होराळे, (दहागाव-छत्तीशी विभाग येथे ४८ वर्ष हा सप्ताह सुरु असून ,उंच अश्या निसर्ग रम्य टेकडी वर हे विठ्ठल रखुमाई चे मंदिर आहे.या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. वारकरी संप्रदाय मंडळ, ह.भ.प. रामदास भाई  महाराज पाटील (अध्यक्ष) संस्थापक, आध्यात्मिक शिक्षण संस्था गुरुकुल महड यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला सप्ताहाच्या निमित्ताने आरोग्य तपासणी समवेत योग शिबीरांचे आयोजन करण्यांत आले होते.यावेळी शेकडो वारकरी,ग्रामस्थ यांनी यांचा लाभ घेतला.

                या ठिकाणी काकडा आरती,ज्ञानेश्वरी पारायन  भजन,प्रवचन,किर्तन येथे सप्ताहाच्या निमित्ताने सुरु आहे.या अखंड हरिनाम सप्ताहाचा  प्रारंभ २० ऑगस्ट,तसेच समारोप २७ ऑगस्ट रोजी होत असतांना जिल्ह्यातील किर्तनकार यांनी आपल्या अमृत वाणीतून वारकरी यांस मंत्र मुग्ध करीत आहे. रामायणाचार्य, जेष्ठ प्रबोधनकार ह.भ.प.अशोक महाराज जाधव पुणे,वेदांताचार्य - राम महाराज वणवे-शास्त्री आळंदी,ह.भ.प. मच्छिंद्र महाराज कुंभार पुणे भोर मावळ, ह.भ.प. तुषार महाराज दळवी मावळ,भागवताचार्य ह.भ.प. रजनीताई जाधव नाशिक,माऊली सुत, जेष्ठ प्रबोधनकार ह.भ.प.आसाराम महाराज बडे आळंदी,श्रीकृष्ण जन्माचे किर्तन रात्री १० ते १२ युवा किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाटील खानाव,तसेच काल्याचे किर्तन - सकाळी १० ते १२ ह.भ.प. रामदास महाराज (भाई ) पाटील संस्थापक, आध्यात्मिक शिक्षण संस्था गुरुकुल महड यांचे होणार आहे.


           काल्याचा महाप्रसाद शंकरशेठ सुदाम मानकवळे (शिरवली),विजय वामनराव कदम (वनवठे), राकेश जयराम जाधव (गोरठण बु.), उदय (राजु) विनायक शहासने (वाबो मित्र बंधु ) यांच्या माध्यमातून देण्यांत येणार आहे.तसेच विठ्ठल रूक्मिणी देवस्थान कमिटी ।। सदानंद रघुनाथ कदम (अध्यक्ष) धोंडू रघुनाथ दाभणे (सचिव) . केशव ना. बुरुमकर, जनार्दन गो. हाडप (सचिव) तसेच सर्व पदाधिकारी, सदस्य, तसेच छत्तीशी विभाग होराळे मंदिर यांच्या माध्यमातून करण्यांत येत आहे. 

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण