खालापुरात राजकीय वातावरण तापले

 खालापुरात राजकीय वातावरण तापले,खालापूर पोलिसांवर राजकीय दबाव कोणाचा ?कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही - राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आक्रमक ...



पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : २७ ऑगस्ट,

            राष्ट्रवादी कॉग्रेसचे मा.तालूका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर काल खालापूर पोलीस स्टेशनं मध्ये  ३०७ चा खोटा  गुन्हा दाखल झाल्याने आज राष्ट्रवादी कॉग्रेसने खालापूर पोलीस स्टेशनला घेराव घालून ठिय्या आंदोलन केले.असल्याने खालापूरात राजकीय वातावरण  तापले आहे, 
             खालापूर पोलिसांवर कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव असून राजकीय आकसापोटी राष्ट्रवादीचे मा.तालूका युवक अध्यक्ष कुमार दिसले यांच्यावर काल ३०७ चा गुन्हा दाखल झाला आहे,हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याचे उत्तर पोलिसांनी द्यावे आणि खोटा गुन्हा रद्द करावा अश्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले, 
           तर खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांची तात्काळ बदली करण्यात यावी,आणि त्याच्यावर कोणाचा राजकीय दबाव आहे त्यांचे नाव जाहीर करावे कर्जत खालापूर तालुक्यात हुकूमशाही चालू झाली असून ही हुकूमशाही मोडीत काढण्यासाठी आम्ही सक्षम असून आमच्या कार्यकर्त्याना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही शांत बसणार नाही असा इशारा राष्ट्रवादिचे नेते सुधाकर घारे यांनी दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

Post a Comment

0 Comments

ग्रामीण रुग्णालय चौक येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी,मार्गदर्शन शिबीर