सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन तर्फे खोपोलीत मंगळागौर,लोक नृत्य स्पर्धेचा जल्लोष महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसात

 सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन तर्फे खोपोलीत मंगळागौर,लोक नृत्य स्पर्धेचा जल्लोष महिलांचा उत्स्पूर्त प्रतिसात




 पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : २५ ऑगस्ट,

          खोपोलीतील सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आणि खोपोली शहर व खालापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित मंगलावर २०२४ पारंपरिक लोक नृत्य स्पर्धेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यांचे पहावयांस मिळाले महाराजा मंगल कार्यालय,खोपोली येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
           या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग भाग घेतला.यावेळी त्यांनी विविध पारंपरिक लोकनृत्य मध्ये आपली कला सादर केली.यावेळी या कार्यक्रमात विशेष अतिथि म्हणून मराठी अभिनेत्री जुई गडकरी अणि शिवानी नाईक उपस्थित होत्या.
        स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी २२,२२२ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११,१११  रुपये, द्वितीय क्रमांक साठी ५,५५५ रुपये रोग बक्षीस ठेवण्यात आले होते.या स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 
             या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे सुधाकर भाऊ घारे कार्यक्रमाचे आयोजक नीलम सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या स्थानिक नेत्या रंजनाताई धुळे, रूपालीताई पाटील आणि प्रीती पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.महिलांनी पारंपारिक वेशभूषा करून विविध लोकनृत्यंमध्ये सहभाग घेतला यामुळे  संपूर्ण वातावरण सांस्कृतिक रंगात रंगुन गेले होते. स्पर्धेच्या माध्यमातून महिला एकत्र येण्याची संधी मिळाली आणि त्यांच्या सांस्कृतिक वारसा अभिमान जपला गेला. या उपक्रमामुळे खोपोली व कोल्हापूर परिसरातील महिलांनी एकत्र येत, आपली कला सादर करून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला.मंगळागौरी स्पर्धेच्या माध्यमातून पारंपारिक संस्कृतीचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि नवीन पिढीला त्याचा अनुभव देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

Post a Comment

0 Comments

खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण