राष्ट्रवादीच्या आंदोलनात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी,खालापुरातील भाजपा आक्रमक,महायुतीत तणाव होण्याची शक्यता
पाताळगंगा न्युज : दत्तात्रय शेडगे
खोपोली : २७ ऑगस्ट,
राष्ट्रवादीकॉग्रेसचे (अजित पवार गटाने )खालापूर पोलीस स्टेशनवर काढलेल्या निषेध मोर्च्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने खालापुरातील भाजपा आक्रमक झाली असून राष्ट्रवादीचा कॉग्रेसचा निषेध व्यक्त केला आहे,
राष्ट्रवादी( अजित पवार गट) हा महायुतीत सामील झाले असले तरी कार्यकर्त्यांना हे पटले नसल्याचे पहावायास मिळत आहे, काल झालेल्या राष्ट्रवादीच्या आंदोलनात भाजपाचा काहीही संबंध नसताना देखील राष्ट्रवादीच्या एका प्रतिष्टीत पदाधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या,
याचा निषेध म्हणून आज भाजपने पत्रकार परिषद घेत याला जोरदार ऊत्तर दिले असून महायुती टिकवायची असेल तर अशी बेताल व्यक्तव्य करणे बंद करा अन्यथा आम्हालाही जशास तसें उत्तर देण्यात असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सनी यादव, उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे,कर्जत विधानसभा युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, खालापूर तालूका सरचिटणीस रवींद्र पाटील, शिरवली ग्रामपंचायत सदस्य संदीप मोरे,खालापूर तालूका युवा मोर्चा अध्यक्ष नागेश पाटील, उपाध्यक्ष खालापूर तालूका प्रसाद देशमुख खालापूर तालूका चिटणीस विलास रसाळ, युवा मोर्चा चिटणीस महेश कडू, कामगार आघाडी चिटणीस दत्ताराम पाटील, सरचिटणीस खालापूर तालूका युवा मोर्चा विशाल लोते, उपाध्यक्ष मयूर पाटील, मनीष पाटील, नयन पाटील, नवीन देशमुख, प्रदीप पिंगळे, अंकुश पोळेकर, अनुप शिंदे, आशिष खराटे, नरेश रसाळ आदी उपस्थित होते
0 Comments