आज पासून खालापूरात शिवसेनेच्या जनसंपर्क दौरा अभियानाला प्रारंभ
(आमदार महेंद्र थोरवे व शिवसेनेचे पदाधिकारी गावागावात जाऊन विकास कामांचा घेणार आढावा)
पाताळगंगा न्युज : हनुमंत मोरे
खोपोली / वावोशी : १९ ऑगस्ट,
आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे खालापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते आज पासून खालापूर तालुक्यातील गाव खेड्याला भेट देऊन तेथे झालेल्या विकास कामांचा तसेच प्रलंबित विकास कामांचा आढावा घेऊन शिवसैनिकांना योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या वतीने हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे स्वतः सहभागी होऊन शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार असल्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे.आजपासून सुरू होणारा हा दौरा पुढे तीन दिवस चालणार असल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.या दौऱ्यामध्ये खालापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद विभाग व खालापूर नगरपंचायत विभाग समाविष्ट करण्यात आलेला आहे.
आमदार महेंद्र थोरवे यांनी मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा घेणे व प्रलंबित विकास कामांच्या बाबत सकारात्मक दृष्टीने विचार विनिमय करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जनसंपर्क दौरा आयोजित करण्यात आला आहे.या दौऱ्यामध्ये स्वतः आमदार महेंद्र थोरवे सहभागी होणार असल्यामुळे या दौऱ्याला शिवसैनिकांच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आमदार महेंद्र थोरवे प्रत्येक गावात शिवसैनिकांच्या भेटी घेणार असून प्रत्येक गावातील झालेल्या विकास कामांची व प्रलंबित विकास कामांची चर्चा करून जी कामे प्रलंबित आहेत त्या कामांना प्राधान्य देऊन सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे.या दौऱ्यामध्ये शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते व शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी होणार असून हा दौरा मंगळवारी सुरू होऊन शुक्रवारी संपणार आहे.
या दौऱ्याचे नियोजन करताना मंगळवारी १८ गावे, बुधवारी १९ गावे,गुरुवारी १५ गावे व शुक्रवारी १९ गावांचा जनसंपर्क दौरा करण्यात येणार असून या दौऱ्याचे नियोजन करून तशी निमंत्रण पत्रिका गाव खेड्यामध्ये पोहच करण्यात आली आहे.
_____ जनसंपर्क दौरा
मंगळवार दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वा.सुरू होत असून या दिवशी खालापूर तालुक्यातील कलोते पंचायत समितीच्या हाळ या गावातून सुरूवात होणार आहे.२१ ऑगस्ट रोजी सावरोली,२२ ऑगस्ट खरिवली व २२ ऑगस्ट रोजी साजगाव पंचायत समिती विभागाचा दौरा करण्यात येणार आहे.
____ कार्यकर्त्यांना दुपारी जेवणाची व्यवस्था ---
दौऱ्यात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना दुपारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी १० वाजता सुरू होणारा हा दौरा रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे.
_____ खालापूर तालुक्यात भगवे वादळ दिसणार ---
शिवसेनेच्या जनसंपर्क दौऱ्यामुळे भगवे झेंडे गाड्यांना लावून दौरा निघणार असल्याने ठिक ठिकाणी या दौऱ्याचे स्वागत करण्यासाठी शिवसैनिक भगवे वातावरण निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने संपूर्ण खालापूर तालुक्यात यानिमित्ताने भगवे वातावरण दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
____ कोट---
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा हा जनसंपर्क दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने ते खालापूर तालुक्यातील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार आहेत.या दौऱ्यात ते स्वतः शिवसैनिकांशी बोलून गावपातळीवरील झालेल्या विकासाची माहिती घेऊन प्रलंबित विकास कामांच्या बाबतीत चर्चा करणार आहेत.असे एकही गाव नाही जेथील शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेणार नाहीत.सर्व शिवसैनिकांना आवर्जून ते भेटणार असल्याने शिवसैनिकांनी सुध्दा या दौऱ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
__ विजयभाऊ पाटील
शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा
0 Comments