खोपोली हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी डॉ. भाईदास पाटील यांची नियुक्ती
पाताळगंगा न्युज : शिवाजी जाधव
खोपोली : ३१ ऑगस्ट,
खोपोली येथील जनता एज्युकेशन सोसायटी ॲड ट्रस्ट द्वारा संचालित खोपोली हिंदी विद्यालय हे खोपोलीतील हिंदी माध्यमाचे नामांकित विद्यालय चालविले जाते या नवीन शैक्षणिक वर्षापासून संस्थेने डॉ. भाईदास पाटील यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करण्यांत आली.
हिंदी साहित्याचे अभ्यासक, लेखक, कवी असून तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे ते सदस्य म्हणून ही कार्यरत होते.तसेच नुकतेच नवीन शैक्षणिक धोरण २०२० साठी त्यांची महाराष्ट्र राज्याच्या सदस्य पदी ही निवड झालेली आहे.अशा उच्च विभूषित व्यक्तिमत्त्वाची मुख्याध्यापक पदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय सिंह,वर्मा जी, सचिव एम. आर. पांडे जी, शालेय समितीचे अध्यक्ष राजीव बोहरा जी तसेच सर्व पदाधिकारी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
0 Comments